ग्रामपंचायत सावरी बीड येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात संपन्न
रोजगार हमी योजनेच्या कामगारांचे प्रमाणपत्र व पुष्पगुच देऊन केला सत्कार
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायत सावरी बीड येथे सकाळी ०८:३० वाजता ध्वजारोहनाचा कार्यक्रम सरपंच लोकनाथ रामटेके यांच्या हस्ते पार पडला त्यानंतर कामगार दिनाचे औचित्य साधून रोजगार हमी योजनेच्या कामगारांना प्रमाणपत्र व पुष्पगुच देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात निखिल सहारे ग्रामपंचायत अधिकारी यांनी संचालन व प्रास्ताविक केले,अध्यक्ष म्हणून लोकनाथ रामटेके यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त मार्गदर्शन केले.प्रमुख अतिथी म्हणून किरण मेश्राम, नलू शेंबडे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते,कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुरेश मेश्राम संगणक परिचालक, दिलीप डांगे शिपाई,विलास चौखे यांनी सहकार्य केले तर कार्यक्रमात लोकेश खामनकार ,अनिल रामटेके,बबिता रामटेके,पुंडलिक करकाळे, लता मेश्राम विविध गावकरी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!