कंत्राटदार करतो शासकीय इमारत बांधकामावर अवैध रेतीचा वापर
लाखोच्या महसुलावर कंत्राटदाराचा हात साफ
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जूनी )
चिमुर : - चिमूर तालूक्यात अनेक ठिकानी शासकीय बांधकामे कंत्राटदाराचे माध्यमातून सुरु आहे.त्या अनेक बांधकामांवर अवैध रेतीचा कंत्राटदार सर्रास पणे वापर करीत आहे.अनेक ठिकानी करोडो रुपयांची बांधकामे कंत्राटदार करीत आहे.प्रत्येक बांधकामात अवैध रेती , अवैध मुरमाचे खुले-आम वापर कंत्राटदार करीत आहे. यामुळे सरकारच्या महसुलावर कंत्राटदार हात साफ करीत असून अनेक ठिकानी कंत्राटदाराने अवैध रित्या रेतीचा साठा साठवून ढेवलेला आहे.एक प्रकारे कंत्राटदार हा रेतीची चोरीच करीत आहे. म्हणून महसुल विभागाने कंत्राटदारावरच कार्यवाही करून कंत्राटदाराचा परवाना रद्द करण्यात यावा. जेणेकरून अवैध रेती तस्करीवर आढा घालता येईल व शासनाचा महसूल चोरीला जाणार नाही.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!