"प्रत्येक बूथ मजबूत करून पक्ष संघटना अधिक भक्कम करा" - खासदार प्रफुल पटेल
पवनी येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन; वलनी व येनोडा येथील युवकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.२६/०४/२०२६ "पक्षाची खरी ताकद ही तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये असते.प्रत्येक बूथ मजबूत असेल तरच पक्ष संघटना भक्कम होते. त्यामुळे बूथ स्तरावर नियोजनबद्ध काम करत जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.पवनी येथील लक्ष्मीरमा सभागृहात आयोजित पवनी तालुका व शहर पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते.यावेळी त्यांनी जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा केली.कार्यकर्त्यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा: मार्गदर्शन करताना खासदार पटेल पुढे म्हणाले की,कार्यकर्त्यांनी केवळ पक्षाचे काम न करता जनतेच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. पक्षाचे विचार,धोरणे आणि शासनाच्या विकास योजना घराघरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे.सर्वांनी एकजुटीने,उत्साहाने आणि प्रामाणिकपणे काम करून पक्ष बळकटीकरणासाठी कटिबद्ध राहावे,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.युवकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश:खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पवनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी ग्राम वलनी व येनोडा येथील अनेक युवकांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये सर्वश्री रोहित येलमुळे, पलिश ठवरे,भूपेंद्र मेश्राम,जितेंद्र मेश्राम,सुरज मंडपे,राज जुंबळे,रवी हुमणे,अविनाश भोवते,समीर मोटघरे यांचा समावेश आहे.खासदार पटेल यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या मेळाव्याला उपस्थित मा.आमदार नाना पंचबुद्धे,सुनील फुंडे,धनंजय दलाल, विजय सावरबांधे, डॉ.विजया नंदुरकर,लोमेश वैद्य,शैलेश मयूर, मुकेश बावनकर,डॉ.विजय ठक्कर, यादवराव भोगे,जितू नखाते,छोटू बाळबुद्धे,रेखाताई भुसारी,नीलकंठ टेकाम,मनोरथा जांभुळे,भाग्यश्री गोमासे,जया भुरे,पुष्पा भुरे,शेखर पडोळे,विक्रम राखडे,रामू भेंडारकर, चरण पलवाल,प्रेमसागर गजभिये, हेमंत मेनवाडे,सोनू रंगारी,प्रकाश पचघरे,हंसाताई खोब्रागडे,हरी काटेखाये,रुद्रम बावनकर,बहाद्दूर गोमासे,मनोज शांतलवार,हेमंत शृंगारपवार,राजू राऊत,सुरेश सावरबांधे, सुलतान अली, रामू मुंडले, नितीन आंबेकर, कुणाल भोगे, ललित खोब्रागडे, सोनू हेजिब, अभिषेक गोमासे यांच्यासह पवनी तालुका व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!