पवनी येथे शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयासाठी प्रफुल पटेल यांना उन्नत समिती ने दिले निवेदन
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - पवनी शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पवनी उन्नत समितीच्या वतीने पवनी येथे शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालय सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन खासदार तथा ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांना सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले कि पवनी व परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जवळपास तांत्रिक शिक्षण संस्था उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दहावी व बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. दरवर्षी सुमारे ५०० हून अधिक विद्यार्थी तांत्रिक शिक्षणासाठी इतर शहरांकडे वळतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना हा खर्च परवडत नसल्याने अनेकांना शिक्षणात तडजोड करावी लागत आहे.
पवनी हे भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाचे तालुका मुख्यालय असून ऐतिहासिक, शैक्षणिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. “विदर्भाची काशी” म्हणून ओळख असलेल्या पवनी येथे पाणी, वीज, रस्ते यांसह आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे येथे तालुक्यातील सर्वांना याठिकाणी येऊनच शिक्षण, शासकीय कामे तथा भव्य मार्केट असल्यामुळे विविध उपयोगी वस्तू खरेदी करायला यावेच लागते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!