जिल्हा परिषद शाळा खेडी येथील विद्यार्थिनीची नवोदयसाठी निवड
सावली - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खेडी येथील विद्यार्थिनी समिक्षा योगराज दुधे या विद्यार्थीनीची नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झालेली आहे.
जिल्हा परिषद शाळा खेडी येथील समिक्षासह इतर 6 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती. यात समीक्षाने यश संपादन केले. यशाचे श्रेय मुख्याध्यापक परमानंद जेंगटे व वर्गशिक्षक विवेक दुधे व आई वडिलांना दिले आहे.
यश संपादन केल्याबद्दल खेडी येथील नागरिक समीक्षा चे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!