खुलेआम उमा नदी पात्रातून केले जाते अवैधरित्या रेतीचे उत्खनन व वाहतूक

रेती चोरट्यांना गावाकऱ्यांनीच पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन

चिमूर तालुक्यातील महादवाडी हरणी येथील घटना

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील हरणी गावातील नागरिकांनी दिनांक. २६/०३/२०२५ ला मध्यरात्री १ ते २ वाजताच्या सुमारास हरणी घाटावर १० ते १२ ट्रॅक्टर पकडले याबाबत ची माहिती पोलीस पाटील तथा गावाकरी व महादवाडी येथील सरपंच भोजराज कामडी यांनी महसूल विभाग व पोलीसांना  दिली. मात्र एक तास उलटून सुद्धा कोणतेही महसूल प्रशासन व पोलीस अधिकरी आले नाही. फोन करून - करून गावकरी थकले असे गावकरी यांचे मत आहे.हा सर्व प्रकार घडून दिड ते दोन तासांनी पोलीस कर्मचारी व नेरी पोलीस चौकीचे अधिकारी चौधरी हे घटनास्थळी पोहोचले मात्र घटनास्थळी पंचनामा न करताच ट्रॅक्टर ताब्यात घेतलेले पडून गेले असे पोलीसांनी सांगीतले. जिल्ह्यात रेती घाटाचे लिलाव कुठेच झालेले नसुन घर बांधकाम तसेच शासकीय इमारतीचे बांधकाम नाल्या व सिमेंट रोडची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून याकरिता  रेतीची आवश्यकता आणि मागणी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे रात्री च्या अंधाराचा फायदा घेत रेती माफिया बिनधास्त पणे कुठलीही भिती न बाळगता रेतीचे उत्खनन व वाहतूक करीत असतात. मात्र याकडे महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने जनता प्रशासणावर शंका व्यक्त करीत आहे. दूरध्वनी ( मोबाईल ) द्वारे अधिकाऱ्यांना फोन करून तक्रार दिली असता कारवाई का करीत नाही असाही प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात आहे. यामुळे रेती चोरट्यांचा मुख्य आका कोण? आणि यांना आशिर्वाद तरी कुणाचा असा सवाल महादवाडी ग्राम पंचायत चे सरपंच भोजराज कामडी यांनी केला आहे.चिमूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांना या घटने विषयी माहिती विचारली असता ६ ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आली असून पसार झालेल्या ट्रॅक्टर मालकांवर कलम ३९२ भारतीय दंड संहिता दरोडा नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!