वरोरा, शेगाव, कोकेवाडा बस सुरू करा - शालेय विद्यार्थ्यांची प्रशाक्षणाला मागणी

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम ) 

वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेवटच्या टोकाला येत असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्प गावातील अर्जुनी तुकुम, कोकेवाडा, येथील विद्यार्थ्यांची बस मागील पंधरा दिवसापासून बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शिक्षणि करीता त्रास सहन करावे लागत असून प्रशासनाने लवकरात लवकर बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्याकडून करण्यात येत आहे. नुकतीच दहावी-बारावीचे परीक्षा झाली असून वरोरा आगाराची नियमित येत असलेली बस ही पंधरा दिवसापासून बंद असून उच्च शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी जात असुन बस बंद झाल्यामुळे शेगाव,चारगाव,अर्जुनी,कोकेवाडा गावातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसअभावी त्रास सहन करावा लागत असून शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, एकीकडे विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा देण्याची सरकारने घोषणा केली आजही जंगलागत असलेल्या ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांना जंगली प्राण्यांच्या भीतीमुळे रात्रीच्या सुमारास येताना आपला जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे,  उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळातच अचानक बस बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असून प्रशासन लवकरात लवकर बस सुरू करण्याची मागणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!