लग्नाचे पत्रिका वाटायला निघालेला नवरदेव मुलगा बेपत्ता
तालूका - प्रतिनिधी ( यश कायरकर )
नागभीड : - सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील धानाचे व्यापारी तथा शेतकरी मनोहर नागोजी बोरकर यांचा मुलगा विनोद मनोहर बोरकर वय (31 वर्षे) त्याचा लग्न जुळल्यानंतर स्वतःच्याच लग्नाच्या पत्रिका आपल्या मित्रांना व नातेवाईकांना वाटण्याकरिता ब्रह्मपुरी येथे गेला. त्यांचा ब्रह्मपुरी येथेही घर असल्याने व तो मुलगा तेथेच राहत असल्याने परिसरात पत्रिका वाटायला गेल्यानंतर ब्रह्मपुरी येथील घरून २० तारखेला गुरूवारी निघताना आई-वडिलांना मी येतो माझा स्वयंपाक करून ठेवा म्हणून फोन केल्यानंतर मुलगा सायंकाळी घरी परत आलाच नाही. त्यानंतर त्यांची मित्र, व नातेवाईकांकडे शोधाशोध केले असता मुलगा कोठेही मिळाला नाही. घरून पत्रिका वाटायला ब्रह्मपुरी ला जाताना त्याने त्याच्याजवळ मोबाईल नसल्याने आईचा मोबाईल सोबत घेऊन गेला व तेथे नवीन मोबाईल घेण्याकरता पैसे सुद्धा घेऊन गेलेला होता मात्र त्याने नेलेला मोबाईल ब्रम्हपुरी येथील घरीच ठेवून मिळाला.
यानंतर सदर घटनेची माहिती ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन येथे तोंडी तक्रारीवरून नोंदविण्यात आली.
सोबत दुचाकी वाहन असलेला वर्ण -सावळा, उंची ५ -फुट ६ इंच, मजबूत शरीर यष्टी, अंगावर जिन्स पॅन्ट (निळा) -शर्ट (हिरवट रंगाची) असे वर्णन असलेला मुलगा हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे करण्यात आली असून कुणाला आढळून आल्यास तशी माहिती पोलिसांना द्यावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!