चांदली बुज. येथे वनहक्क समितीची शिवार फेरी - वनक्षेत्र निश्चित करून नियोजन आराखडा तयार केले
सावली - अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वनहक्क कायदा 2006 नुसार चांदली बुज. येथे वनविभागाचे 34.03 हेक्टर आर क्षेत्र सामूहिक वनहक्क पट्टा मंजूर झालेला असून समितीच्या वतीने वृक्ष लागवड, देखबाल, संरक्षण करण्यात येणार आहे. आज गावात शिवार फेरी काढून जनजागृती करण्यात आली. वनहक्क मिळालेल्या जागेवर जाऊन क्षेत्र निश्चित करण्यात आले व नियोजन करण्यात आले. यावेळी वनहक्क समितीचीचे उपविभागीय कार्यालयातील व्यवस्थापक रजनीताई घुगरे, सरपंच विट्टल येगावार, समितीचे अध्यक्ष सीताराम कोडापे, सचिव विलास येनगंटीवार, वनरक्षक लंकेश आखाडे, तलाठी वैभव निशांकर, मोतीराम नागापुरे रिवार्ड संस्था नागभिड, उपसरपंच मनिषा मोहुर्ले, योगिता संतोषवार ग्रा.पं.सदस्या, वैशाली कन्नाके पोलीस पाटील चिंतामन बालमवार, तंमुस अध्यक्ष दिलीप मोहुर्ले, राकेश गुंडावार इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!