अषित प्राथमिक शाळा पवनी येथे नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत मूल्यांकन चाचणी

जेष्ठही होणार साक्षर!

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दिनांक.२३/०३/२०२५ नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत असाक्षरांची दि.२३ मार्च रोजी जिल्यातील विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत मागिल काही वर्षांपासून असाक्षरांची नोंद घेऊन त्यांना प्राथमिक धडे देण्यास सुरुवात झाली होती.आता परीक्षा देऊन जे उत्तीर्ण होतील त्यांना साक्षर असल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
देशात कोणीही निरक्षर राहू नये यासाठी केंद्र शासनाने नवभारत साक्षरता कार्यक्रमाला सुरुवात केली.पायाभूत संख्याज्ञान मूल्यांकन चाचणीमध्ये वाचन, लेखन, संख्याज्ञान सह १५० गुणांचा पेपर असून उत्तीर्ण होण्यासाठी १७ गुण आवश्यक आहेत.न.प.पवनी अंतर्गत अषित प्राथमिक शाळा मंगळवारी वार्ड,पवनी येथे सदर परीक्षेचे आयोजन करण्यात आले.यावेळी ७‌ परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षा दरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी संजयकुमार वासनिक तथा केंद्रप्रमुख राजु तुमसरे यांनी भेट देऊन पाहणी केली व शांततेत परीक्षा असल्याबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी केंद्र संचालक मुख्याध्यापक राकेश बिसने तथा पर्यवेक्षक अशोक गिरी, शिक्षक प्रयागराज भोयर, मुरलीधर जिवतोडे, स्वयंसेवक नक्षिता खोब्रागडे यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!