जागतिक जलदिन निमित्त जि.प.उच्च प्राथमिक शाळा नेरला येथे पक्षी संवर्धनासाठी अभिनव उपक्रम

 "जल दिन संवर्धनाची साद,निसर्गाशी संवाद"

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दिनांक.२६/०३/२०२५ जलदिना निमित्त जि. प.उच्च प्राथमिक शाळा नेरला येथे स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. शाळेचा मुख्याध्यापिका रंजना सहारे यांच्या प्रेरणातून व मार्गदर्शनाखाली पक्षासाठी घरटे व पानवटे उभारण्याच्या अनोख्या पद्धतीने स्तुत्य उपक्रम घेण्यात आला."पक्ष्यांना निवारा देऊया निसर्गाचे मित्र होऊ !'या भावनेतून निसर्ग प्रेमाची भावना जागृत करण्यात आली. वाढत्या शहरीकरणामुळे पक्षांचे नैसर्गिक अस्तित्व नष्ट होत चालले आहेत. अन्न व पाण्याची कमतरता भासत असल्याने पक्ष्यांच्या अस्तित्वावर संकट कोसळले आहेत.अशा परिस्थितीत संवेदनशील जबाबदारी ओळखून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर प्लास्टिकच्या बाटल्या, पुठ्ठ्याचे तुकडे, कागद ,दोरखंड आणि इतर टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून पक्षांसाठी सुरक्षित घरटे व पानवटे तयार केले.या उभारणी कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अमोल शहारे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच प्रमुख पाहुणे शा.व्य.समिती सदस्य शुभांगी गजभिये आणि नेरला केंद्राचे केंद्रप्रमुख रामभाऊ गेडाम उपस्थित होते.शाळेतील शिक्षिका विनू लेंडे यांचे या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी कमीत कमी वेळात उत्कृष्ट घरटी तयार केली‌ आणि पक्षांच्या संवर्धनावर प्रेरणादायी कविता सादर करून पक्षी प्रेमाची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. पौर्णिमा दुबे,कांचनमाला हेडाऊ,शैला दहिवले, विलास सुखदेवे आणि प्रशिक्षक निशांत रामटेके या सर्वांचे उपक्रमासाठी सहकार्य लाभले.विशेष म्हणजे शाळेच्या उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांनी ही घरटी‌ आणि पानवटे  आपल्या घराच्या परिसरातील झाडावर लावण्याचा संकल्प केला. त्यामुळे पक्षांना सुरक्षित निवारा आणि पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांच्या या कल्पक उपक्रमामुळे त्यांच्यात संवेदनशीलता आणि जबाबदारीचे भावना निर्माण झाली.तसेच निसर्ग प्रेम वाढीस लावण्यास मदत झाली.पक्षी आणि निसर्ग यांची जीवनसाखळी टिकण्यासाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे.हा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.या  पक्षी मित्र उपक्रमाची सर्वत्र कौतुक होत असून विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षण वर्णन डायरी सुरू करण्याचा निर्णय घेतला.'निसर्ग संवर्धन हीच खरी सेवा' हा संदेश ठळकपणे अधोरोकीत झाला. जलदिनानिमित्ताने 'पाण्याचा थेंब थेंब वाचवा,पक्षांसाठी पाणवटे सजवा'! असा संदेश मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!