बिबट्याच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी

तालूका - प्रतिनिधी ( यश कायरकर )

नागभीड : - तळोधी बा.वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या तळोधी बीटातील तळोधी बा. येथील गुराखी जयंत राजेश्वर जुमडे, वय 23 आपले गुरे चारायला शेताकडे गेलेला असताना, अचानक बसलेल्या बिबट्याने हमला केल्याने गंभीर जखमी झाल्याची  घटना घडली. असून त्याला तात्काळ तळोदी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. संबंधित घटनेची माहिती मिळतात वन विभागात कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन  घटनास्थळाचा मोक्का पंचनामा केला असता बिबट्याने हमला केल्याचे आढळून आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!