तळोधी बा. पोलिसांच्या कारवाईत १७ लाख १० हजार रुपयांची देशी दारू व वाहन जप्त.
यश कायरकर:
तळोधी पोलिसांनी अवैध दारू वाहतूक बद्दल माहितीच्या आधारे नागभीड-सिंदेवाही मार्गावरील चिखलगाव जवळ नाकाबंदी करून १७ लाख १० हजार रुपयांची देशी दारू व वाहन जप्त करून एका आरोपीला अटक केली. २९ मार्चच्या रात्री तळोधी पोलिसांनी ही कारवाई केली.
२८ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता तळोचीच्या ठाणेदार संगीता हेलोंडे है पोलीस उपनिरीक्षक किशोर मानकर व मपोअं वैष्णवी लेनगुरे यांच्यासह गस्तीवर निघाले होते. दरम्यान त्यांना नागभीडकडून तळोधीकडे येणाऱ्या महिंद्रा वाहनात दारू आणली जात असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलीस ठाण्याचे हवालदार रत्नाकर देहरे, पो अं उत्तम घुगवा, सैनिक आखरे, चापोहवा सुरेश आत्राम यांना माहिती देऊन नागभीड- सिंदेवाही मार्गावरील चिखलगाव येथे बोलावून तेथे नाकाबंदी केली. काही वेळाने महिंद्रा एक्सयूवी ५०० वाहन क्र. एमएच ४० बीसी ०३३८ येताना दिसले. पोलिसांनी इशारा करून गाडी थांबवली, त्याची झडती घेतली असता त्यात २ लाख १० हजार रुपयांची देशी दारू भरली होती. पोलिसांनी हिंगणघाट जि. वर्धा येथील गौतम नगर वॉर्डातील शेख अहमद इक्बाल अहमद शेख (२७) याच्याकडे दारूसंदर्भात चौकशी केली असता, त्याच्याकडे दारू वाहतूक करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी नव्हती. त्यामुळे तळोधी पोलिसांनी १५ लाख रुपयांची वाहने व २ लाख १० हजार रुपयांची दारू असा एकूण १७ लाख १० हजार रुपयांचा माल जप्त करून आरोपींना अटक केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर मानकर करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!