पवनी येथे तालुकास्तरीय गौरव पुरस्कार समारंभ
"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" टप्पा-२ चे वितरण
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.२८/०३/२०२५ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन मध्ये सन - २०२४-०२५ अंतर्गत तालुका स्तरावर जि.प.प्रा. शाळा कोंढा शाळेने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले,द्वितीय क्र.जि.प. उच्च.प्राथ.शाळा आमगाव तर तृतीय क्र. जि.प.उच्च प्रा.शाळा चिचाळ (मुले) तसेच इतर व्यवस्थापनाच्या शाळांमधून प्रथम क्र. राजुभाई विद्यालय आसगाव,द्वितीय क्र. गांधी विद्यालय वलनी तर तृतीय क्र.सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय पवनी या शाळेला प्राप्त झाले.प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेले शाळांना शासनातर्फे प्रत्येकी अनुक्रमे ३ लक्ष, २ लक्ष व १ लक्ष थेट डीबीटी द्वारे मुख्याध्यापक यांचे खातेवर प्राप्त होणार आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत १५० गुणांचे परीक्षण करण्यात आले.त्यात अध्ययन निष्पत्तीनुसार विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, आनंददायी शिक्षण, शिक्षकांनी केलेली शैक्षणिक साहित्य निर्मिती,परसबाग निर्मिती, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कंपोस्ट खत निर्मिती, यासह विविध बाबींचे केंद्र व तालुका स्तरावर परीक्षण करण्यात आले. यामध्ये निवड झालेल्या शाळांना पं.स.सभागृह येथे तालुकास्तरीय गौरव पुरस्कार प्रदान समारंभ दि.२८ मार्च रोजी दु.१ वा.आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी दीपक गरुड तर प्रमुख अतिथी पं.स. सदस्या सविता बिलवने, मंगला बाळबुधे, गटशिक्षणाधिकारी शरदचंद्र शर्मा,शिक्षण विस्तार अधिकारी संजयकुमार वासनिक आदींची मंचावर उपस्थिती होती.
सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजक शिक्षण विस्तार अधिकारी संजयकुमार वासनिक यांनी प्रस्ताविक सादर केले.प्रस्ताविकातून त्यांनी सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योजनेतून "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आले. त्यामुळे शाळांचा सर्वांगीण, शैक्षणिक व सामाजिक घटकांचा विकास करता आला.त्यामुळे या अभियानाला महाराष्ट्रातून विद्यार्थी, शाळा,पालक, शिक्षक व समाज यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अशाप्रकारे कार्यक्रमांची माहिती देऊन रुपरेषा सादर केली.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी शरदचंद्र शर्मा यांनी आपल्या भाषणातून सांगितले की,या अभियानामुळे राज्यातील शाळा स्वच्छ व सुंदर दिसू लागल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी दीपक गरुड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, हे अभियान शाळा विकासासाठी खुप प्रभावी ठरले.त्यामुळे शाळांचा भौतिक विकास होऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागली.त्यानंतर पुरस्कार प्राप्त शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सदर कार्यक्रमाला पुरस्कार प्राप्त शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक वृंद, केंद्रप्रमुख,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,गावचे सरपंच, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षण प्रेमी तथा समग्र शिक्षा अभियानाचे समस्त कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गटसमन्वयक दिपाली बोरीकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार साधन व्यक्ती डॉ.मुरलीधर रेहपाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महेंद्र वाहने, विना रंगारी,सरिता डाखोळे, भोजराज पडोळे, संजयकुमार नंदुरकर,सुनील मोटघरे, रत्नदीप लोणारे,कैलास शहारे,विठ्ठल रामटेके, जनाबाई हेमने यांनी अथक परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!