तळोधी येथे पक्षी सप्ताह निमित्ताने पक्षी निरीक्षणाचे आयोजन
(वन विभाग तळोदी व 'स्वाब' संस्थेच्या वतीने आयोजन.)
तळोधी (बा.):
5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीमध्ये पक्षी तज्ञ ,पक्षी निरीक्षक सलीम अली व मारुती चितमपल्ली या दोन पक्षी तज्ञांच्या जन्मदिवसाच्या अवचित्य साधन 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या आठवड्यात पक्षी सप्ताह संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. याच पक्षी सप्ताह निमित्ताने 'तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र व स्वाब नेचर केअर फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी गोविंदपुर बीटातील सारंगगड व लावारी तलाव परिसरात या पक्षी निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले.
विशेष म्हणजे या कालावधीमध्ये या परिसरात मोठ्या प्रमाणात विदेशी प्रवासी पक्षी येऊन मुक्काम ठोकतात त्यामुळे पक्षी निरीक्षकांकरिता आकर्षण केंद्र असलेल्या या दोन्ही तलावाच्या परिसरात आज पक्षी निरीक्षणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पक्षी मित्र स्वप्नील मेश्राम व बंधू अक्षय मेश्राम यांनी पक्षांबद्दल बारकावे समजून पक्षी निरीक्षणाला सहकार्य केले. तर त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार व स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी पक्षी निरीक्षणाकरिता उपस्थितांना पक्षांचे निसर्गातील महत्त्व व पक्षी सप्ताहाचे आयोजन मागील कारण समजून सांगितले.
यावेळी तळोधी व गोविंदपूर चे क्षेत्र सहाय्यक आर.एस.गायकवाड, क्षेत्र सहाय्यक चंद्रशेखर रासेकर, वन रक्षक श्रिरामे, वडजे, पाटील, लोनबले, मांठरे, मेकेवाड, तोरले, भरणे, चुधरी वन रक्षक ,वन कर्मचारी व स्वाब संस्थेचे शैक्षणिक विभाग प्रमुख नितीन भेंडाळे, वन्यजीव विभाग प्रमुख छत्रपती रामटेके, अमीर करकाडे, शुभम निकेश्वर, विनोद लेनगुरे, व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी विविध 41 प्रजातीच्या पक्षांची नोंद करण्यात आली यामध्ये स्थानांतरित काही पक्षी तर काही पानथडी, रानातील पक्षांची नोंद करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!