विलास डांगे यांची भाजप ला सोडचिट्टी

पत्रकार परिषदेमध्ये मांडले वयक्तिक मत 

उप संपादक 
विलास मोहिनकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र नावाजले असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर तथा जिल्हा परिषद गटनेते व स्थाई समिती सदस्य जिल्हा नियोजन समिती चंद्रपूर विलास डांगे यांनी आज दिनांक. १३ नोव्हेंबर २०२४ ला राहत्या घरी चिमूर या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करून भारतीय जनता पार्टी बद्दलचे थोडक्यात मत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडण्यात आले. विलास डांगे यांनी म्हटले कि मी काँग्रेस पक्षातून भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला. काही दिवस माझ्याशी चांगली वागणूक मान सन्मान होत होता परंतु नंतर अचानक अपमानास्पद वागणूक देने विचारात न घेणे कोणतीही पक्षाची जबाबदारी न देणे असे असतांना लोकसभेमध्ये मी प्रामाणिक काम केले व स्वतः जवळचे पैसे खर्च केले. मात्र काही पदाधिकारी यांचेकडून दुजाभाव केला जात आहे असे या बद्दलचे मत बंटीभाऊ यांना सांगितले भाऊंनी अध्यक्ष झाडे व इतर पदाधिकारी यांना गाडीत सोबत घेत जा सांगितले मात्र तसे झाले नाही. तसेच विधानसभा निवडणुकीची सुद्धा मला जबाबदारी दिलेली नाही. सर्व कार्यकर्ते यांना जबाबदारी दिली गेली. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभेकरिता मला हेलिपॅडची जबाबदारी दिली. त्यात मी उपस्थित होतो मात्र पदाधिकारी यांची वागणूक तीच होती. या कारणास्तव मान सन्मान याच तत्वावर मी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. व मी खाली बसणारा माणूस नसून माझा मस्या स्वगृही (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात) लवकरच परतणार आहे.यावेळी नरेंद्र कारेकर ( उ.बा.टा.गट ), कमलाकर बोरकर ( उ.बा.टा.गट ), संतोष कामडी ( उ.बा.टा.गट ), अनिल डगवार ( उ.बा.टा.गट ) व आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!