वडेट्टीवारच्या प्रचार बॅनरवर महावितरणची कारवाई!

वडेट्टीवारच्या प्रचार बॅनरवर महावितरणची कारवाई! 

महावितरणच्या पोलवर लावलेले विजय वडेट्टीवार यांचे प्रचार बॅनरवर महावितरणने कारवाई सुरू केली आहे.  महावितरणचे कर्मचारी अग्रक्रमाणे विजय वडेट्टीवार यांचे प्रचार बॅनर महावितरणच्या खांबावरून काढत असल्यांने राजकीय वर्तुळात चर्चेचे कारण बनले आहे.

काही दिवसापूर्वीच विरोधी पक्ष नेते विजय ​वडे​ट्टीवार यांची मुलगी, शिवाणी विजय वडेट्टीवार यांनी महावितरणच्या अधिकारी/कर्मचार्यांना अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ केल्यांचा व्हिडीओ समाजमाध्यमात चांगलाच वायरल झाला होता.  या वादग्रस्त व्हिडीओत शिवाणी विजय वडेट्टीवार या महावितरणच्या अधिकारी/कर्मचार्यांना अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ करीत असल्यांचे दिसत आहे.  यामुळे महावितरणच्या अधिकारी/कर्मचार्यांत विजय वडेट्टीवार यांचे विरोधात असंतोष निर्माण झाला असून, या शिव्याचे उत्तर इव्हिएम मशीन मधून दिला जाईल असा इशारा हे कर्मचारी देत आहेत.  शिवाणी वडेट्टीवार या जेष्ठ कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची कन्या आहेत, त्यांचेकडून संस्कारी भाषेची अपेक्षा असतांना ते प्रचारात शिव्या देत आहेत.  त्यांचे नांव शिव्यानी असायला पाहिजे असा संतप्त सवाल हे कर्मचारी करीत आहे.

कारवाईचा व्हिडिओ लिंक

महावितरणचे अधिकारी/कर्मचारी शिवाणी वडे​ट्टीवार यांचे शिव्यावरून अॅक्शन मोडवर येत, महावितरणच्या खांबावर लावलेले विजय वडेट्टीवार यांचे प्रचार फलक काढत असल्यांचा व्हिडीओ आता समाजमाध्यमात वायरल होत आहे. फलक काढणारे,  'विजय वडेट्टीवारच्या पोरीनं शिव्या दिले नं.. बॅनरला मोडमाड करा' असे म्हणत हा फलक काढतांना व्हिडीओत दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!