कन्हैया कुमार उद्या बल्लारपूरात, संतोष रावत यांच्या प्रचारार्थ गांधी चौकात जाहीर सभा . शो शश



बल्लारपूर :- कन्हैया कुमार हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली च्या विद्यार्थी संघाचा अध्यक्ष होते. युवकाचा आयकन म्हणून प्रसिद्ध असून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर डिबेट गाजवले असून अनेक वर्षापासून जन आंदोलनात भाग घेतले आहे. त्यामुळे त्यांची युवकांमध्ये लोकप्रिय अधिक वाढली आहे. ते दलित, मुस्लिम, पुरोगामी, परिवर्तनवादी म्हणून प्रसिद्ध असलेले कन्हैया कुमार साम्यवादी विचार सरणीचे आहे. कन्हैया कुमार यांच्या नेतृत्वात काँग्रेस, महाविकास आघाडी दिशा देणार. संतोष सिंह रावत यांच्या प्रचारात काय बोलतात याचा कडे बल्लारपूर विधानसभा मतदार चे लक्ष आहे. आघाडीचे उमेदवार संतोष सिंह रावत यांचात कमालीचे उत्साह निर्माण होणार आहे. या अनुषंगाने ७२ बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष सिंह रावत यांच्या प्रचारार्थ १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता कन्हैय्या कुमार यांची जाहीर सभा गांधी पुतळ्या जवळ वस्ती विभाग बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. कन्हैया कुमार यांच्या जाहीर सभेला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडी ने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!