सुप्रसिद्ध नाट्य कलावंत गौतमी पाटील यांची होणार क्रांतीभूमी चिमुर शहरात दमदार एन्ट्री
९ ऑक्टोबर ला ग्रामगिता महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन
तालुका - प्रतिनिधी ( केवळसिंग जुनी )
चिमूर : - सुप्रसिद्ध नाट्य कलावंत गौतमी पाटीलची यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाली असून ती तिच्या कलागुणांतून जनतेसमोर नृत्य सादर करीत असते यामुळे ती महाराष्ट्रात सुप्रसिद्ध नाट्य कलाकार म्हणून ओळखली जाते सोशल मीडियावर देखील गौतमी पाटील हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर येत असतात. तिच्या नृत्याचा कार्यक्रम दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०६:०० वाजता चिमूर शहरातील ग्रामगिता महाविद्यालयाचे भव्य मैदानावर आयोजित केला आहे.या कार्यक्रमाचे आयोजन चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशन चे संयोजक गौतम पाटील यांनी केले असून या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेतुन देण्यात आली.कार्यक्रमाला सुमारे २० हजाराचे वर नागरिक उपस्थित राहतील अशी माहिती सुद्धा चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशन चे संयोजक गौतम पाटील यांनी दिली. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेवराव किरसान, आमदार अभिजित वंजारी, चिमुर - ७४ विधानसभा समनव्यक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सतीश वारजूकर, शिवानी वडेट्टीवार, तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील गावंडे, प्रा. राम राऊत, पंजाबराव गावंडे, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस ओबीसीचे प्रदेश संघटक धनराज मुंगले, संजय डोंगरे,संजय घुटके, ऍड. दिगांबर गुरुपूडे, जिल्हा परिषद माजी सदस्य गजानन बुटके आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.या कार्यक्रमा बाबत सविस्तर माहिती देताना मुख्य आयोजक गौतम पाटील म्हणाले, गौतमी पाटील हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. गौतमी हिच्या कार्यक्रमांना देखील चाहत्यांची मोठी गर्दी जमते.गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी नाही असं कधीच झालेलं नाही गौतमी पाटील हिची एक झलक बघण्यासाठी युवा चाहते कायम उत्सुक असतात. त्यामुळे शांतता व सुव्यवथा अबाधित राखण्याची काळजी घेण्यात येणार आहे. अशीही माहिती पत्रकार परिषदेत गौतम पाटील यांनी माहिती दिली.हि पत्रकार परिषद धनराज मुंगले यांचे मार्गदर्शनात चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशनचे संयोजक गौतम पाटील, राजेंद्र लोणारे, प्रदीप तळवेकर, लोकनाथ रामटेके, जिल्हा परिषद बांधकाम माजी सभापती गुणवंत कारेकर , संदीप कावरे , नागेश चट्टे ,रोहण नन्नावरे, अमीत मोदी ,अक्षय नागरीकर तसेच फाउंडेशन चे आदी पदाधिकारी तथा सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!