सुधीरभाऊनी एक निर्णय घेतला आणि मूल शहराला मिळाले लाखो रूपये महिण्याचे शाश्वत उत्पन्न!
सुधीरभाऊनी एक निर्णय घेतला आणि मूल शहराला मिळाले लाखो रूपये महिण्याचे शाश्वत उत्पन्न!
एखाद्या निर्णयाने शहराचा चेहरा—मोहरा बदलू शकते! एखाद्या गावाची अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते आणि शेकडो रहीवाशांना शाश्वत उत्पन्नही देवू शकते यांचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे, राज्याचे वन व सांस्कृतीक कार्य मंत्री तसेच राज्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मूल शहरात घेतलेले कृषी महाविद्यालय निर्मीतीचा निर्णय ।
कोणे ऐकेकाळी चंद्रपूर-गडचिरोली जिल्हयांची ओळख मागास जिल्हयाची! त्यातही मूल तालुका हा धान पट्यातील मागास तालुका म्हणूनच गणल्या जायचा. या तालुक्याला राजकीय वलय प्राप्त असले तरी, आरोग्य आणि शैक्षणिक उदासिनता या शहराला असल्यांने, शहरवाढीलाही मर्यादाच होत्या! मागील अनेक वर्षापर्यंत शहराची हीच परिस्थिती आणि ओळखही होती, त्यामुळेच अनेकांनी गाव सोडणे पसंत केले होते.
निवडणूक आयोगाने 2009 मध्ये मतदार संघाची पुर्नरचना करून, परिसिमा बदलविली आणि बल्हारपूर निर्वाचन क्षेत्राची नव्याने निर्मीती होत, त्यात मूल तालुक्याचा समावेश झाला. या निर्वाचन क्षेत्रात सुधीर मुनगंटीवार यांची आमदार म्हणून वर्णी लागली. आमदार झाले, राज्यात सत्ता काँग्रेस-राष्ट्रवादीची होती. मात्र आक्रमक स्वभावाने आपल्या आमदारकीच्या काळात शहरात अनेक विकासाची कामे खेचून आणली, करोडोचा निधी आल्यांने शहराचा भौतिक चेहरा-मोहरा बदलला. यामुळेच 2014 च्या निवडणूकीत 'लाखा'वर मते घेण्यांचा विक्रम त्यांना करता आला.
भौतिक विकासासोबतच सुधीर मुनगंटीवार यांनी, सोमनाथ येथील कृषी महाविद्यालयाचे “अपग्रेडेशन'' करीत, पंजाबराव कृषी विद्यापिठाचे विभाजन करून सोमनाथ, मूल येथे नवे कृषी विद्यापिठ निर्माण करण्यांचा संकल्प केला. मूल येथे नवे कृषी विद्यापिठ मंजूरही झाले. काही तांत्रिक पुर्ततेमुळे विद्यापिठ निर्मीतीस वेळ लागत असल्यांने त्यांनी तातडीने मूल शहरात कृषी महाविद्यालय स्थापन करण्यांचा निर्णय घेतला, अर्थमंत्री असल्यांने लगेच हवे तेवढा निधी देत, प्रत्यक्ष अमंलबजावणी केली, आज हे कृषी महाविद्यालय आकारास आले आहे. याच कृषी महाविद्यालयातून पहिली यशस्वी बॅचही निघाली आहे.
कृषी महाविद्यालयामुळे, मूल तालुक्यातील शेतकर्यांना विशेषत: धान उत्पादक शेतकर्यांना तांत्रिक ज्ञान मिळत आहे, कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी शेतकर्यांच्या बांधावर जात आहे. गावात कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी—शिक्षक शेतकर्यांच्या बैठका घेत आहे. त्याचा लाभ शेतकर्यांना मिळत आहेच, मात्र त्यापेक्षाही मूल शहरात 240 चे वर राज्यभरातील विद्यार्थी ज्ञानार्जनाकरीता येत असल्यांने, जेवणाचे डब्बेवाले, मेस चालविणार्या महिला, हॉटेल व्यावसायीक किरायाने घरे देणारे घरमालक, ऑनलाईनचे छोटे व्यावसायीक, झेराक्स सेंटर चालक, स्टेशनरी दुकानदार यांचेसह अनेकांना रोजगाराची साधने उपलब्ध झाली आणि तीही शाश्वत, कायम! या विद्यार्थासोबतच कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी यामुळेही थोडे का होईना, बाजारात रौनक आली.
एका कृषी महाविद्यालयाचे निर्मितीमुळे शहरात वर्षाला 50 लाख रूपयाची उलाढाल वाढल्यांचे एका कापड व्यापार्यांनी स्पष्ट केले तर, अनेक गावातून आपल्या पाल्याला कृषी महाविद्यालयात शिकण्याकरीता सोडायला आलेल्या राज्यभरातील पालकांना मूलची, मूलच्या व्यापाराची विशेषत: तांदुळ उद्योगाची झालेली ओळख आणि मूल शहराचे या निमीत्ताने वाढलेले महत्व अनेकांनी मान्य केले.
एका कृषी महाविद्यालयामुळे, मूलच्या व्यवस्थेत जर ऐवढे बदल होत असेल तर, सुधीर मुनगंटीवार यांचे स्वप्नातील कृषी विद्यापिठाची निर्मीती मूल तालुक्यात झाल्यास, मूलचे चित्र प्रचंड वेगाने बदलेल हे सांगायला कुण्या जोतिष्याची गरज नाही, मात्र मूल शहरासह जिल्हयाचे, जिल्हयातील शेतकर्यांचे भविष्याचे चित्र बदलणार काय? या प्रश्नाचे उत्तर येणार्या विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांचे बाजूने मतदारांचा कल कसा असेल यावरच अवलंबून आहे.
विजय सिध्दावार
9422910167
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!