वन्यजीव सप्ताहात बाईक रॅली व वृक्षारोपण, वन विभाग व स्वाब संस्थेचे आयोजन.
(सिंदेवाही ते चिटकी 15 किलोमीटर बाईक रॅली तर चिटकी येते विविध फळझाडांचे वृक्षारोपण.)
सिंदेवाही:
संपूर्ण देशामध्ये एक आक्टोंबर ते सात आक्टोंबर हा वन्यजीव सप्ताह म्हणून वन विभाग व स्थानिक एनजीओ मार्फत पर्यावरण पूरक विविध उपक्रम राबवून साजरा केला जातो. यातच शिंदेवाही वनपरिक्षेत्र कार्यालय तथा स्वाब नेचर केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.
यावेळी स्वाब संस्थेचे संपूर्ण सदस्य व शिंदेवाही वन विभागातील संपूर्ण वन कर्मचारी यांनी शिंदेवाही पासून 'शिंदेवाही शहर - किन्ही - सरडपार - चिटकी' या १५ कि.मी. अंतरापर्यंत बाईक रॅली काढली. या रॅलीमध्ये ''वृक्ष लावा, वृक्ष जगवा! वन्य प्राण्यांचे संरक्षण करा!,
एक पेड, अनेक फायदे!" अशा पद्धतीचे पर्यावरण मार्गदर्शक नारे लावत ही रॅली पूर्ण केली. यानंतर चिटकी येथे मागील वर्षी तीन ऑक्टोबरला हत्ती मेलेला होता त्या जागेवर आंबा, चिंच, सीताफळ, आवळा, करवंद, बेहडा, बादाम, हिरडा, या प्रकारच्या वेगवेगळ्या फळझाडांची लागवड करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. त्यानंतर स्वाब संस्थेद्वारे हत्तीच्या स्मरणात मागील वर्षी लावण्यात आलेल्या दोन्ही वडाच्या झाडा भोवती मानवी शृंखला बनवीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर वनामध्ये अल्पोहाराचा कार्यक्रम करण्यात आला.
या रॅलीचे नेतृत्व सिंदेवाही चे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर व स्वाब संस्थेचे प्रमुख सल्लागार हरिभाऊ पाथोडे, संस्थेचे सचिव अनिल लोनबले, अध्यक्ष यश कायरकर यांनी केले. यावेळी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वन कर्मचारी स्वाब संस्थेचे संपूर्ण पदाधिकारी, डब्लू.पी.एस.आय. चे रोषण धोतरे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!