तळोधी (बाळापुर) येथे महिलांचा "हळदी- कुंकू व स्नेह मिलन सोहळा" संपन्न.



तळोधी( बाळापुर)वार्ताहर
            स्थानिक जय संताजी तेली समाज तळोधी (बाळापुर) च्या महिला कार्यकारणीच्या वतीने नुकताच आयोजित "महिलांचा हळदी- कुंकू कार्यक्रम व स्नेहमिलन सोहळा " संपन्न झाला.
        " हळदी कुंकू व स्नेहमीलन सोहळा" चे उद्घाटन तळोधी (बा.) येथील धान संशोधक महिला प्रगत शेतकरी सौ. आसावरी पोशेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.प्रीती नरेश निंबेकर या लाभल्या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. पद्माताई भास्करराव कामडी, माजी जिल्हा परिषद सदस्य , सौ. छायाताई घनश्याम मदनकर, सरपंच- ग्रामपंचायत तळोधी (बाळापूर) सौ. सुरेखाताई दिलीप कामडी, अध्यक्ष -महिला कार्यकारिणी , सौ अर्चनाताई देवानंद कामडी, सचिव- महिला कार्यकारणी ,सौ.सुनीताताई जयदीप मदनकर ,संघटक -महिला कार्यकारणी , सौ प्रा.डॉ.शुभांगी विरेंद्र पाकमोडे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
         याप्रसंगी महिलांकरिता व युवती करिता विविध कलात्मक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते तसेच समाजाच्या वतीने संक्रांति निमित्त हळदी -कुंकू व वान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी तेली समाजातील बहुसंख्य महिला माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
         "हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेहमिलन" सोहळ्याचे प्रास्ताविक प्रा. डॉ. शुभांगी वीरेंद्र पाकमोडे यांनी केले तर सूत्रसंचालन सौ.प्रतिमा रविंद्र पाकमोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.सुषमाताई विलास  मोटघरे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!