राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची तरुणांना संधी - संतोष नन्नावार
तळोधी(बा)04/02/2023
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ तळोधी (बा) द्वारा संचालित यादवराव पोशट्टीवार कला महाविद्यालय तळोधी(बा) च्या सौजन्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन जि.प.उच्च प्राथ शाळा आकापूर येथे करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या निमित्याने उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
या उद्बोधन कार्यक्रमाकरीता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्रा.अनिल थेरकर रा.से.योजना कार्यक्रम अधिकारी,प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ. शशिकांत शेंडे ,या.पो.महाविद्यालय तळोधी(बा), संतोष नन्नावार पदवीधर शिक्षक लोकविद्यालय तळोधी(बा),उपस्थित होते.
यावेळी डॉ.शशिकांत शेंडे यांनी 'आजचा युवक व करिअर 'या विषयावर मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की,आजच्या नव- युवकांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना स्वतःचा कल,स्वतःवर असलेला आत्मविश्वास , स्वावलंबीपणा सकारात्मकतेने विचार पूर्वक आपले शिक्षण, आपली नोकरी व आपले क्षेत्र निवडले पाहिजे तरच त्या दिशेने अधिक प्रगती होते.
संतोष नन्नावार यांनी 'युवकांची समाज निर्मितीत भुमिका' या विषयावर मार्गदर्शन केले.मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की,युवा म्हणजे एक आनंद, एक उत्साह, एक हिमत. आज आपल्या देशात युवा पिढी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतांना दिसतोय. आपल्या भारत देशामध्ये ६५% युवक आहेत आणि हेच युवक उद्याचे भविष्य आहे. आपल्याला गौरवशाली भारत घडविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. गणित, विज्ञान, भाषा या विषयाखेरीज आपल्याला चारित्र्य या विषयाकडे लक्ष देण हे फार महत्वाच झाल आहे. आज समाजाला अलौकिक,उज्वल, चारित्र्यवान युवापिधीची गरज आहे. स्वयंसेवी सामुदायिक सेवेद्वारे विद्यार्थी युवकांचे व्यक्तिमत्व आणि चारित्र्य विकसित करण्याच्या प्राथमिक उद्देशाने एनएसएसची सुरुवात करण्यात आली.‘सेवेद्वारे शिक्षण’ हा एनएसएसचा उद्देश आहे. माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी हे या योजनेचे बोधवाक्य आहे. ते आपणाला लोकशाही, सामाजिक बांधिलकीची जाणीव करुन देते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करण्याबरोबरच समाजासाठी खूप मोलाचे योगदान देता येते.समाजउपयोगी कार्यासाठी, समजाच्या प्रगतीसाठी NSS शिबिराच्या वेळी राष्ट्रसेवेची सेवेची संधी आपल्याला दिली जाते असे सांगितले.यावेळी गावातील पालक , प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!