श्रीहरी बालाजी महाराज घोडा यात्रा महोत्सव निमित्ताने काँग्रेस पक्षातर्फे भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमूर येथील श्रीहरी बालाजी महाराज घोडा यात्रा महोत्सव निमित्ताने आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे सामाजिक कार्यकर्ते दिवाकर निकुरे चिमूर विधानसभा क्षेत्र यांचेकडून भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.हे कार्यक्रम दि.३ फेब्रुवारी ला घेण्यात आले तसेच दि.६ फेब्रुवारी सोमवार ला सुद्धा महाप्रसाद वाटप करण्यात येणार असेही काँग्रेसचे सामाजिक कार्यकर्ते दिवाकर निकुरे यांनी सांगितले. यावेळी गजानन बुटके , राजू दांडेकर , राजू लोणारे , रत्नाकर विटाळे , जावेद शेख , गौतम पाटील , कल्पना इंदूरकर , नाजमा पठाण , रिता अंबादे , आदींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!