जंगली डुकराच्या हल्ल्यात अर्जुनी तुकुम येथील पोस्टमन जखमी

जंगली डुकराच्या हल्ल्यात अर्जुनी तुकुम येथील पोस्टमन जखमी
वनविभागांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची गावकऱ्यांची मागणी....

शेगाव....(जगदीश पेंदाम)
येथून जवळच असलेल्या तसेच ताडोबाक्षअंधारी  व्याघ्र प्रकल्प जंगलालगत असलेल्या अर्जुनी तुकुम गावामधील पोस्टमन या पदावर असलेले दिलीप आनंदराव मडावी वय 56 यांना जंगली डुकरानी हमला करून जखमी केले आहे..
अर्जुनी तुकुम हे गाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जंगलालगत असल्यामुळे नेहमीच या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असल्याने परिसरामध्ये वन्य प्राण्यांच्या हमल्याच्या घटनेत वाढ होताना दिसत असुन अर्जुनी तुकुम येथील पोस्टमन हे पोस्ट ऑफिसची डाग नेहमी प्रमाणे चारगाव खुर्द येथे नेत असताना अचानकपणे ईरई नदी जवळ रानडुकराने पोस्टमन दिलीप आनंदराव मडावी यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे जखमी पोस्टमन यांना गावकऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालय वरोर येथे उपचार करीता नेले असुन डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठवले आहे..
 जंगलालगत असणाऱ्या गावामध्ये नेहमीच वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा घटनेत वाढ होत असून अशा घटनांमुळे ऐन शेतीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी कामे कसे करायचे असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी शासनाने तसेच वनविभागाने ह्या समस्येकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन जखमी झालेल्या नागरीकाला आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!