जांभुळघाट येथील मागासवर्गीय वस्तीच्या कामात झाला भष्टाचार

हरगोंविद मसराम(ग्रा.प.सदस्य) यांनी मुख्य अधिकाऱ्याकडे केली तक्रार

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - तालूक्यातील मौजा जांभुळघाट ग्राम पंचायत अंर्तगत मागासवर्गीय वस्तीमध्ये उद्दाने,बगीचे,क्रीडांगण व ग्रंथालय इत्यादी कामासाठी अंदाज पत्रकानुसार निधी ग्राम पंचायतला आला होता. पण कंत्राट दाराने हे काम न करता फक्त गट्टू लावून छोटासा क्रिडांगण तयार करण्यात आला.बाकी कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आले नाही.अंदाज पत्रकागुसार काम झालेले नाही,या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भष्टाचार झालेला आहे.व रक्कमेची उचल करून अफरा-तफर केल्यामुळे चौकसी करण्यात यावी.त्या करीता मुख्य अधिकाऱ्याकडे याची तक्रार करण्यात आली आहे. तात्काल चौकसी करून भष्ट्राचार करणाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी. ग्राम पंचायत सदस्य हरगोविंद मसराम यांची मागणी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!