सावरी प्राथमिक आरोग्य केंद्र बनला जनावरांचा गोठा - प्रहार सेवक विनोद उमरे


आरोग्य विभागाचे दुर्लक्ष दोन वर्षे पासुन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - सावरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची जुनी इमारत जीर्ण झाली असून, त्या करिता करोडो रुपये खर्चून नविन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. पण बांधकाम करण्यात आलेल्या करोडो रुपयांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम होऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने व आरोग्या विभागाच्या दुर्लक्षामुळे आज लाखोंची इमारत जनावरांचा गोठा बनलेली दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने व लोकप्रतिनिधी यांनी यांकडे लक्ष देऊन या इमारतीचे लवकरात लवकर उद्घाटन करावे अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे.नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे. नागरिकांना चांगल्या दर्जाचे औषोधोपचार व्हावे.याकरिता सावरी येथे करोडो रुपये खर्च करून सुसज्य अशी प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत बांधण्यात आली. मात्र दोन वर्षे होऊनही उद्घघाटनाच्या प्रतिक्षेत आरोग्य केंद्राची इमारत आहे. 
या इमारतीचे उद्घाटन करण्यात यावे अशी मागणी  सतत करुन सुध्दा आरोग्य विभाग लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचे आरोप प्रहार सेवक विनोद उमरे व त्यांचे सहयोगी राजूभाऊ वाकडे, मुरलीधर रामटेके, सुनिल पंचवटी, नारायण निखाडे, मिलिंद खोब्रागडे,यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!