चार दिवसांपासून बेपत्ता इसमाला वाघाने केले ठार;



चिधिमाल परिसरातील घटनेने खळबळ; 

नागभिड
      चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका इसमाचा मृतदेह चिधिमाल तलाव परिसरात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
      मिळालेल्या माहितीनुसार, मोरेश्वर गोपिचंद सावसाकडे (वय 65 वर्ष) रा. तुकुम (तिवर्ला) हा इसम 16ऑगस्टला घोडाझरी जंगलामध्ये  चिधिमाल तलाव परिसरात मासे पकडायला गेलेला होता.दरम्यान रात्र होवूनी परत आला नाही. तेव्हा घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी 17 ऑगस्टला वनविभाग व पोलीस विभागाला देण्यात आली होती. गेले चार दिवसांपासून शोधमोहीम सुरु होती. मात्र त्याचा मृत्यूदेह चिंधिमाल गावाजवळील तलाव परिसरात आढळून आला.
     या घटनेची माहिती मिळताच पोलिस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी करून परिसराची तपासणी करण्यात आली. त्याच्या मृतदेहाच्या बाजूला मासे पकडायचा सामान पडलेला होता. आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उंच उंच असा गवत वाढलेला आहे त्यामुळे जवळ येईपर्यंत त्याला वाघ दिसलेला नसावा व वाघांचे हल्यात मृत्यू झाल्याचे समजते.  जनकापूर येथिल रमेश जैराम काशिवार याला ४ ऑगस्ट वाघाने अड्याळमेंढ परिसरात वाघाने ठार केल्याला १५ दिवस होत नाही तोच चिंधिमाल परिसरात वाघाने पुन्हा एका वृद्ध इसमाला ठार केल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
     वनविभागाने परिसरात गस्त वाढवून नागरिकांना जंगल व वनक्षेत्रालगत एकट्याने न जाण्याचे आवाहन केले आहे.
   दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, वनविभागाने वाघाच्या हालचालींचा शोध घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
       जनकापूर परिसरातील  अड्यळमेंढा, नवेगाव रिठ, चिंधिमाल या परिसरात वाघाचा वावर असुन वन विभागांची गस्त सुरू आहे. वाघाला जेरबंद करण्यापूर्वीच्या उपायोजना सुरु असुन लाइव्ह कॅमेराद्वारा निरिक्षण सुरू आहे. वन अधिकाऱ्यांसह ३० वनमजूर ५ ऑगस्ट पासून गस्तीवर आहेत. नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाली असून वाघांचा त्वरीत बंदोबस्त करावा असी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
           "पावसाळ्यामुळे जंगल जंगलातील झुडपे हे घनदाट झालेली असून कोणीही एकत्याने जंगलात आत मध्ये किंवा तलाव परिसरामध्ये जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये, त्यामुळे वन्यजीवांचे हमले होऊन जीव जाण्याची शक्यता असते." - भारती बघमारे, वनपरिक्षेत्र अधिकारी नागभीड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!