गॅस धारकांना सिलेंडर उपलब्ध करून द्यावे - अर्चना चावरे यांची मागणी

गॅस धारकांना सिलेंडर उपलब्ध करून द्यावे - अर्चना चावरे यांची मागणी

मूल (अमित राऊत )


मूल शहरातील संजय फ्लेम गॅस एजन्सी कडून गॅस धारकांना सिलेंडर उपलब्ध करून देण्यात यावे, या मागणीचे निवेदन तहसीलदार  डॉ. रवींद्र होळी यांना देण्यात आले. मूल शहरात गॅस सिलिंडरचा पुरवठा होत नसल्याने शहरातील गॅस धारकांना गॅस एजन्सीकडून त्रास सहन करावे लागत आहे.
त्यामुळे गोरगरीब नागरिक त्रस्त झाली असून एकीकडे केरोसीन बंद असल्याने व दुसरीकडे वनविभागाकडून लाकूड काड्या मिळत नसल्यामुळे सिलेंडर अभावी उपाशी राहण्याची वेळ आली आहे, यासाठी गॅस एजन्सी वाल्यांना वेळेवर सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावे,या मागणीचे निवेदन मूल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा तथा संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्या अर्चना चावरे यांनी दिले आहे.
यावेळी मूल महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षा जयश्री झरकर, वार्ड अध्यक्ष आशा चिताडे, चंदाताई कारेकर, कल्पना मेश्राम, अर्चना मेश्राम, सपना करकडे,मंदा दूधकोवर आदी महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!