तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील वनविभागाच्या गाडीचा टायर फुटल्याने अपघात.

तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील वनविभागाच्या गाडीचा टायर फुटल्याने अपघात.
तळोधी बा.
वन विभागाच्या तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील गाडी क्रमांक MH -34 -AB- 6890,  चे आज दुपारला तळोधी वरुन सिंदेवाही ला जात असताना  सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पळसगाव जाट जवळील नाल्याच्या पुलावर गाडीच्या समोरील डाव्या बाजूच्या टायर फुटल्याने गाडी नियंत्रित होऊन पुलाच्या कळेला आदळल्याने अपघात झाले. यात  कार चालक दीपक बारसागडे याला किरकोळ जखम झाली. 
सिंदेवाही पोलीसांनी मोक्का पंचनामा करून. गाडी वनविभागाच्या सुपूर्द केली, त्यानंतर सावरगाव येथील  रोपवाटिकेमध्ये गाडी ठेवण्यात आली.
            मात्र होळी व उन्हाळ्याच्या संवेदनशील वेळी च गाडीचे अपघात झाल्यामुळे तळोधी वनपरिक्षेत्र आत्ता अपाहीजच झालाय. त्यामुळे गाडी तात्काळ दुरुस्त करून किंवा वन विभागाने दुसरी गाडी उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. कारण संपूर्ण चंद्रपूर मध्ये ब्रह्मपुरी वनविभागातील तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्र हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र म्हणून मानले जाते. त्यामुळे गस्ती करिता या परिक्षेत्रात 24 तास गाडी उपलब्ध असणे अत्यंत  आहे आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!