बल्लारपूर येथे समाजशास्त्र विभागाद्वारे महिलादिनानिमित्य सेवाभावी महिलांचा सत्कार

बल्लारपूर येथे समाजशास्त्र विभागाद्वारे महिलादिनानिमित्य सेवाभावी महिलांचा सत्कार

महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागातर्फे विभिन्न क्षेत्रातील महिलांचा सत्कार


बल्लारपूर प्रतिनिधी:-(धनंजय पांढरे)

शिक्षक प्रसारक मंडळद्वारा संचालित , महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात दिनांक 16 मार्च 2022 ला महिला दिना निमित्य महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागातर्फे विभिन्न क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलनाने झाली.

कार्यक्रमाची प्रास्ताविकता समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.शुभांगी भेंडे शर्मा यांनी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.सौ. कल्याणी पटवर्धन होत्या तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ .श्रुती लोणारे , समाजसेवी तसेच सौ. डॉ. ज्योती डांगे, वैद्यकीय अधिकारी बल्लारपूर .तसेच सौ. स्नेहा भाटिया ,रणरागिनी हिरकणी फाउंडेशन बल्लारपूर होत्या. सर्व प्रमुख अतिथीचे समाजशास्त्र विभागाकडून स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कोरोना काळात श्रुती लोणारे यांनी कशा पद्धतीने गावातील मोकाट कुत्र्यांचे सेवाकार्य केले व अजूनही हे कार्य करीत असताना त्यांना स्वतः कशा पद्धतीने अडचणींचा सामना करावा लागतो याबद्दल माहिती दिली. तसेच रणरागिनी हिरकणी फाउंडेशनद्वारा ‘हर भुके को भोजन ‘ या संकल्पनेतून अन्नदान उपक्रम कशा पद्धतीने चालविला जातो याबद्दलची माहिती दिली. त्याचप्रमाणे डॉ. ज्योती डांगे (वैद्यकीय अधिकारी, बल्लारपूर)phc यांनी कोरोना काळातच नव्हे तर इतरही दिवशी रुग्णांची सेवा करणे हेच जीवनाचे ध्येय असल्याचे सांगितले.

समाजशास्त्र विभागाकडून महात्मा गांधी जयंती निमित्य आणि महिलादिनाच्या औचित्याने पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार कु.कोमल भास्कर मरस्कोल्हे तसेच कु.नीतू राजभर यांना मिळाला. तर द्वितीय पुरस्काराच्या मानकरी कु.चैताली टपाली आणि लीना महानंद ठरल्या. तसेच महाविद्यालयाच्या कु.बरखा यादव आणि अर्शिया पठाण यांनी बॉल बॅडमिंटन ऑल इंडिया 2022 या खेळात द्वितीय पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.


 
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ.सुनील कायरकर, डॉ.पंकज कावरे, डॉ.चौरे, डॉ. मंडल डॉ.चव्हाण,प्रा.कवाडे, प्रा.टेकाडे, प्राध्यापिका जुनघरे, प्रा.माकोडे, प्रा. नंदुरकर उपस्थित होते तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु. स्नेहा गौर यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. श्वेता लभाने यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!