भाजपच्या कुशासनाच्या निषेधार्थ दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजप महाराष्ट्र कार्यालयाला 'आप'ने घेराव घातला.

भाजपच्या कुशासनाच्या निषेधार्थ दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजप महाराष्ट्र कार्यालयाला 'आप'ने घेराव घातला.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजपच्या गुंडांनी केलेल्या हिंसक हल्ल्याचा निषेधही या वेळेस करण्यात आला.

मुंबई बँकेच्या आरोपी प्रवीण दरेकर यांच्य विरोधी पक्षनेते पदाच्या  तात्काळ राजीनामा मागणी करण्यात आली.


भाजपच्या कुशासनाचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीने आज नरिमन पॉइंट, दक्षिण मुंबई येथील भाजपा महाराष्ट्र कार्यालयाला घेराव घातला. भाजपा सरकार राजकारणाच्या नावावर अत्यंत घृणास्पद कृत्य करत आहे.  मग ते मुंबई बँक घोटाळ्यातील आरोपी व विरोधी पक्षनेते  प्रवीण दरेकर यांनी केलेला नंगा भ्रष्टाचार असो, किंवा दिल्लीचे मुख्यमंत्र्यांचे अरविंद केजरीवाल यांच्या  निवासस्थानावर  भाजपच्या गुंडांनी केलेली तोडफोड असो. 
आज आप ने काढलेल्या रॅलीवर  पोलिसांनी हिंसकपणे तोडफोड केली, पक्षाच्या स्वयंसेवकांवर हल्ला केला आणि उपस्थित जमावाला जबरदस्तीने ताब्यात घेतले.

दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या  यशामुळे भाजप अस्वस्थ आहे आणि आज केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यात उपस्थित असलेली पोलिस केवळ त्रयस्थपणे सगळं पाहत बसली होती. भाजपच्या गुंडांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले, सुरक्षा अडथळे फोडले आणि निवासस्थानाच्या गेटची तोडफोड केली. भाजपला वाटतं की ते देशाच्या कायद्याच्या वर आहेत आणि आम आदमी पार्टीला रोखण्यासाठी आवश्यक ते उपाय करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात.

भाजप महाराष्ट्र कार्यालयासमोर घोषणाबाजी आणि बॅनर घेऊन जमलेल्या पक्षाच्या नेत्यांनी आणि स्वयंसेवकांनी भाजप नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली. प्रवीण दरेकर यांनी  मुंबई बँकेची निवडणूक लढवण्यासाठी आणि जिंकण्यासाठी मजूर असल्याचा खोटा दावा करून मुंबईकरांची फसवणूक केली आहे. त्यांनी स्वतःला विरोधी पक्षनेते म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे आणि या गुन्ह्यासाठी त्यंनाय कठोर शिक्षा भोगावी लागेल.


"भाजपचा असा विश्वास आहे की त्यांचे नेते आणि समर्थक देशाच्या कायद्याची पर्वा न करता  पूर्णपणे दण्डहीनतेने वागू शकतात. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजपच्या गुंडांनी केलेला हल्ला धक्कादायक आहे आणि हा हल्ला भाजप सत्ता काबीज करण्यासाठी कोणत्याही मार्गाचा पाठपुरावा करण्यास तयार आहे हे दर्शविते. भाजप आप च्या वाढत्या वाढीला पाहू शकत नाही. आणि म्हणूनच आप ला रोकण्यासाठी अशी भयंकर पाऊलं ते उचलत आहेत.  पण आम्ही खचून जाणार नाही. भाजप नेते प्रवीण दरेकर यांना अटक करावीच लागेल आणि त्यांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा तात्काळ राजीनामा द्यावाच लागेल. प्रवीण दरेकर यांनी केलेल्या घोटाळ्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना करावी, अशी 'आप'ची मागणी आहे." असे वक्तव्य आप चे महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!