पीकअप दुचाकीत अपघात, एक ठार एक गंभीर जखमी
पीकअप दुचाकीत अपघात, एक ठार एक गंभीर जखमी
मूल (अमित राऊत)
मूल तालुक्यातील बोरचांदली पुलाजवळ पिकअप आणि दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.
मृतकाचे नाव विनोद नागापुरे राहणार चांदापूर तर अविनाश गेडाम हा गंभीर जखमी झाला आहे.
हे दोघेही युवक दूचाकी ने चांदापूर वरून मुलकडे येत असताना मुल वरून चामोर्शी कडे जाणारा पीकअप वाहन यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात मोठा अपघात झाला. या अपघातात विनोद नागापुरे वय 25 याचा जागीच मृत्यू झाल्याने आणि अविनाश गेडाम हे चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेत असताना याचा पण मृत्यू झाला या दोघांच्या मृत्यू मुळे चांदापूर वासिय हळहळ व्यक्त करीत आहे.
घटनास्थळाचा पोलीस पंचनामा करुन पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!