चिमूर तहसिल ला पिण्याच्या पाण्याची सोय नाही - रमेश खेरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवा दल तालुका अध्यक्ष यांचा आरोप

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमूर हे शहर स्वतंत्र संग्राम म्हणून नावलौकिक आहे.या तालुक्यात ९३ ग्राम पंचायत आणि १ नगर परिषद असून तालुक्यातील जनता शासकीय कामाकरिता ये जा करीत असतात. परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांच्या ऑफिस समोर पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने जनतेला या कडक उन्हाळ्यात चिमुकल्या बाळांना घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी चहा टपरी गाठावे लागत लागत आहे.याचा तपास प्रामुख्याने स्वतः रमेश खेरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवा दल तालुका अध्यक्ष यांनी घेतला असता पिण्याच्या पाण्याचे फ्रिजर हे पूर्णपणे बंद व घाणेरड्या अवस्थेत आढळून आले. याबाबत तहसिल च्या अधिकारी यांना विचारणा केली.तर त्यांनी वरिष्ठ अधिकारी यांनी यावर तोडगा काढावा आम्ही आमच्या खिशातून खर्च करावा का ? अशी उत्तरे दिली. म्हणून यावर वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ गांभीर्याने लक्ष देऊन तहसिल ला आलेल्या जनतेच्या पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यात यावे असे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!