आलेवाही येथे तेंदुपत्ता व वनवा यासंदर्भात चर्चासत्

आलेवाही येथे तेंदुपत्ता व वनवा यासंदर्भात चर्चासत्
 तळोधी बा.(यश कायरकर) 
तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत आलेवाही येथील वनविभागाच्या नाक्यावर आलेवाही चे सरपंच, पोलिस पाटील, तेंदूपत्ता ठेकेदार, व गावकरी यांच्याशी संवाद साधून वनविभागाने जंगलातील वनवा, तेंदूपत्ता, हंगामात घ्यावयाची काळजी या संदर्भाने चर्चासत्र आयोजित केले.
      यावेळी तेंदूपत्ता संकलनाच्या परवाना घेताना तेंदूपत्ता ठेकेदारांनी जंगलात वणवा लागल्यास आम्ही आमचे पाच मजूर वन विभागाला सहकार्य करण्याकरिता देऊ. असे सांगितले होते. मात्र या संदर्भाने जंगलात वणवा लागल्यानंतर वनविभागाला तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या ठेकेदारामार्फत कोणतेही मजूर पुरविण्यात आले नाही. व उलट जंगलात वनवा लागण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. यामुळे या सर्वांना वन विभागाच्या नाक्यावर बोलून चर्चासत्र घेण्यात आले.
     या संदर्भात माहिती देण्याकरिता ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी चे सहाय्यक उपवनसंरक्षक (एसीएफ) वाकडे,  नागभीड चे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड, तळोधी बा.चे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास धोंडणे, वनरक्षक एस बी पेंदाम, वनमजूर देवेन्द्र ऊईके, सरपंच्या सौ.योगिता सुरपाम, पोलीस पाटील आणि तेंदूपत्ता ठेकेदार व गावकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!