शेतातील गोठयातून ६ शेळया चोरी ,अज्ञात इसमावर गुन्हा दाखल
शेतातील गोठयातून ६ शेळया चोरी ,अज्ञात इसमावर गुन्हा दाखल
तळोधी( बा)(यश कायरकर)
गावापासून काही अंतरावर नथ्थुजी चांदेकर यांच्या शेतात गोठा बांधलेले असून त्या मध्ये शेळया पालन करुन व्यवसाय करीत होता .गोठयामध्ये बांधलेल्या ५ मोठे बकरे व एक लहान असे सहा शेळया किंमत ३२००० रुपये सोमवारी रात्री अज्ञात इसमाकडून चोरी करण्यात आले.तळोधी बा.पोलिस स्टेशन ला नथ्थुजी धोंडूजी चांदेकर रा.तळोधी बा.यांनी तक्रार दाखल करुन घटनास्थळी जावून पंचनामा करण्यात आला.
शेळयाचा चारा पाणी करून मालक घरीच राहत असल्याने अज्ञात इसमाने गोठयातून शेळया चोरीस नेल्या असून तळोधी बा.पोलिस स्टेशन येथे अज्ञात इसमावर आरोपीविरुध्द कलम ४६१,३८०,भांदवी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तळोधी पोलिस स्टेशनचे प्रभाकर मंगाम करीत आहे .भुरट्या चोरांचा तपास करून आरोपी विरुध्द कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!