बेवारस प्राण्यांचा, तो करतो सन्मानाने अंत्यविधी...
शंकरपूर.... जगदीश पेंदाम
धरतीवर निसर्गामध्ये मानवी जीवनात मृत्यू अटळ असतो पण तो कधी अकाली नको मृत्यूनंतर अंत्यविधी सन्मानाने व्हावा हीच आपल्या संस्कृतीची शिकवण असून ते मुक्या जनावरांसाठी सुद्धा लागू पडतो, परंतु बेवारस मुक्या प्राण्यांच्या जीवनात फार कमी पाहायला मिळत असते ही वेदना मनाला एका तरुणाला पोचल्याने येथील माई फाऊंडेशनचे अमोल देवगिरकर या तरुणाने नागभिड आणि चिमूर तालुक्यात मरण पावलेल्या जनावरे, प्राण्यांना सन्मानपुर्वक दफनविधी करण्याचा उपक्रम मागील चार ते पाच वर्षापासून सुरू केला आहे...
अमोल देवगिरकर हे शंकरपूर येथे पॅथॉलॉजी सेंटर चालवित असून त्यांनी माई फाऊंडेशनचे स्थापना केलेली आहे, रस्त्यावरील अपघातामध्ये कुत्री, मांजरे गाई-बैल व ईतर वन्यप्राणी मृत पावत असतात त्यांच्या कोणीच वाली नसल्याने अनेक दिवस रस्त्याच्या बाजूला पडून राहतात व दुर्गंधी सुटली तरी कोणी त्याला फेकून दफन करीत नाही असे चित्र अमोलने अनेक वेळा पाहिले त्यामुळे मुक्या पाण्याची विटंबना पाहून तो अस्वस्थ झाला काही ग्रामपंचायत कर्मचारी मृत जनावरे गावाच्या सीमेवर फेकून निघून जातात त्यामुळे कोणाची वाट पाहण्यापेक्षा आपणच कर्तव्य बजावले पाहिजे असा विचार करून पाऊल उचलले आहे.
माई फाउंडेशनच्या वतीने अमोल देवगिरकर मागील पाच वर्षापासून मरण पावलेल्या प्राण्यांचा सन्मानपूर्वक अंत्यविधी करत असून याकरिता निशुल्क सेवा करून आतापर्यंत हजारोचा वर( 1141) मेलेल्या प्राण्यांच्या अंत्यविधी त्यांनी केलेला आहे.....
एखाद्या नागरिकांनी गावामध्ये मरण पावलेल्या प्राण्याबद्दल माहिती दिल्यानंतर ते सोबत नेलेल्या व्यक्तीला प्राणी दफन केल्यानंतर स्वतः शंभर रुपये देत असतात ही सेवा आजही चिमूर व नागभीड तालुक्यातील अहोरात्र सुरू आहे....
जनावरे प्राणी जिवंत असतात व माणसासोबत वावरतात त्यामुळे ते एक घरच्या सदस्य असते मात्र प्राणी मेल्यानंतर यांच्यावरही माणसासारखे अंतिम संस्कार होणे आवश्यक आहे सन्मानपूर्वक अंत्यविधी होणे हा प्राण्यांचाही हक्क आहे तो हक्क त्यांना मिळावा यासाठी जनतेनी प्राण्याबद्दल माणुसकी धर्म पाळावा..... अमोल देवगिरकर माई फाउंडेशन शंकरपुर



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!