मूल येथील युवकांची तलावात उडी घेवून आत्महत्या
मूल येथील युवकांची तलावात उडी घेवून आत्महत्या
मूल येथील सोमनाथ रोडवर राहणार्या मनोज बावनकर, वय 30 वर्ष या युवकांने मूल बस स्थानकांजवळील तलावात उडी घेवून आत्महत्या केल्यांचा दुर्देवी घटना घडली.
मनोज हा आपल्या आईसह राहत होता. ता सकाळीच घरून बाहेर पडला व 10 वाजताचे सुमारास त्याचे प्रेत मूलच्या तलावात तरंगताना दिसून आल्यांने, ही घटना पोलिसांना कळविण्यात आली. पोलीसांनी प्रेत ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी मूलच्या उपजिल्हा ग्रामिण रूग्णालयात पाठविले.
मृतक मनोज बावनकर हा वेडसर असल्यांची माहिती आहे. मूल पोलिसांनी घटनेचा मर्ग दाखल करून, तपास सुरू केला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!