तलावात बुडून विवाहितीचा मृत्यू
सावरगाव - (प्रतिनिधी)
नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील जयश्री राजेंद्र निकुरे(21) या विवाहितेचा गाव तलावात बुडून मृत्यू झाला .जयश्रीचे मार्च महिन्यात लग्न झाले होते.परंतु लग्न आधी पासूनच तिच्या डोक्यात थोडा फार फरक असल्याचे बोलले जात आहे , सदर घटनेची माहिती तळोधी(बा ) पोलीस स्टेशनला दिली.घटनास्थळी पोलीसउपनिरीक्षक राकेश साखरे, सुरेश पानशे, सुधाकर भानारकर,मोरेश्वर शिंदे दाखल होऊन प्रेत तलावातून बाहेर काढले. व उत्तरिय तपासणी करून नातेवाईकांच्या स्वाधीन केले घटनेचा पुढील तपास ठाणेदार रवींद्र खेरकर , यांच्या मार्गदर्शनाखाली तळोधी पोलीस करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!