शेगांव (बु) येथिल ग्रा.प.च्या आपशी वादांमुळे गावकरी सोय-सुविधे पासुन वंचित


सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - शेगांव (बु )येथिल ग्राम पंचायत मधिल आपशी वाद सुरू आहे पण आपशी वादांमुळे गावातील नळाला दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्यात शेगांव वाशीयांना कोणत्याही सोयी सुविधा मिळत नाही दि.१२.मार्च २०२१ रोजी ग्राम.प.ला माहीतीच्या अधिकारात एक अर्ज सादर केला असून अजून पर्यंत त्यांनी कोणतेही माहिती दिली नाही. ग्राम.प.आपशी वादांमुळे हे ५ वर्ष वादांत जाईल काय असा प्रश्न ? गावकऱ्यांना पढला आहे.या करिता  बि. डि .ओ .(BDO) वरोरा यांना निवेदन देऊन ग्रा.प.शेगांव (बु) यांना भेट देऊन सदर परिस्थितीची चौकशी करून गावकऱ्यांना न्याय मिळून द्या ,अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष महीला आघाडी कडून शेगांव(बु) ग्राम.प.ला ताला ठोक आंदोलन करण्यात येईल , या करिता प्रहार सेवक शेरखान पठान यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आला. त्यावेळी उपस्थित  प्रहार सेवक सौ, गीताताई किशोर फुलकर सौ. रंजनाताई सोनुने सौ. सिंधुताई मडावी , कु. माधुरी पोईनकर , शेरखान पठाण, सागर कामडी, मुजमिल शेख , राकेश भुतकर , किशोर फुलकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!