कोरोना काळात व्यापारीच करतात कोरोना नियमाचे उल्लंघन

चिमूर येथे किराना दुकानाचे व्यापारीच करतात दुकानाची उघड़ झाप

नगर परिषदेचे याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ एप्रिल पासून चंद्रपुर जिल्ह्यात संचारबन्दी लागू करण्यात आली.तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठानें, बाजारपेटा बंद ठेवन्याचे निर्देष देण्यात आले होते. व चिमूर येथील उपविभागीय अधिकारी यांनी गर्दी कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांना ९ ते २ हा वेळ ठरऊन दिला होता तरी सुधा चिमूर येथील एक व्यापारी सर्रासपणे दुकानाची उघड़झाप करीत असून नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे.असे असतांना आज चिमूर शहरात रोज १०० ते १५०० रुग्ण कोरोना पोझिटिव आढ़ळत असून २ ते ३ रुग्ण दगावित आहे, शासनाचा आदेश सर्व व्यापारी पाळत आहेत, तरी सुधा चिमूर येथील असावा किराना स्टोर्स दुपारी २ नंतर सुधा उघड़झाप होताना दिसत आहे. याकडे नगरपरिषद मात्र दुर्लक्ष करीत आहेत,व आजही तोच प्रकार समोर आला असून सकाळपासून दुकाने सुरू आहे.उपविभागीय अधिकारी यानी ताबड़तोब कार्यवाही करावी अशी नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.जिल्हाधिकारी यांनी याकडे जातीने लक्ष देऊन कोरोना या रोगावर मात करण्यासाठी अशा आपत्ती व्यवस्थापन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा जेणेकरून कोरोनाचा शिरकाव थांबेल.

1 टिप्पणी:

झिंदाबाद!