चिमुर शहरात कोरोनाचे नियम धाब्यावर, नागरिकांची खरेदी साठी गर्दी आणि प्रशासन मात्र सुस्त
वाढत असलेल्या कोरोना रुग्णास जबाबदार तरी कोण ?
गावभर फिरेन आणि कोरोना करेन
नगर परिषद ,पोलीस विभाग व तहसील कार्यालयाची कारवाही
गरिबांना मारा श्रीमंतांना तारा हे काय ?
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - नगर परिषदेचे कर्मचारी बिना माक्सने फिरणाऱ्या लोकांवर करतात कारवाही मग चिमूर शहरातील मेन लाईन मधील मार्केट मध्ये किराणा सामान खरेदीसाठी होत असलेल्या गर्दीवर नगर परिषदेची महेरबानी का ? शहरात कोरोनाचा स्फोट होऊन रोज शेकडोच्या संख्येने नागरिक कोरोना पॉझिटिव्ह सापडत असून मृत्युच्या प्रमाणात दिवसें - दिवस वाढ होत आहे. नागरिक खरेदीच्या नावावर गर्दी करत आहेत.प्रशासन मात्र गाढ़ झोपेत असते असे का ? राज्यात कोरोना महामारीचे संकट ओढावले असताना राज्य सरकार या परिस्थितिवर नियंत्रण करन्याकरिता सर्वो परी प्रयत्न करीत आहे. मात्र चिमुर शहरात या उलट परिस्थिति निर्माण झाली आहे. राज्य सरकारनी दिवसा जमावबंदीचे आदेश काढले असताना चिमुर शहरात मात्र घोळक्याने नागरिक रस्त्यावर फिरत आहेत, जीवनाशक वस्तु खरेदी करण्याच्या बहान्याने नागरिक बाहेर निघत आहेत. या प्रकरनाकडे मात्र तहसील प्रशासन, नगर परिषद, व पोलिस विभाग जानिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, सुजान नागरिक प्रशासनाकडे जेव्हा गर्दी होण्याबद्दल च्या तक्रार करतात तेव्हा तक्रार करणाऱ्यांचे नाव नगर परिषद कडून जाहिर करण्यात येते अशी तक्रार सुद्धा काही नागरिक करीत आहेत, त्यामुळे तक्रारदारानी तक्रार करायची तरी कशी.
गाव भर फिरीन ! आणि कोरोना करीन
कोरोनाचे काळात लोकडॉउन सुरु असताना सुधा लग्नची खरेदी जोरात सुरु असून लग्न सुध्दा धूमधडाक्यात सुरु आहे, अनेक व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी Rtpcr टेस्ट, लसिकरन केलेली नसताना ते धड़ाक्यात व्यवसाय करीत आहेत, पॉझिटिव्ह रुग्ण घराबाहेर पडूंन काम करीत आहेत मग यावर नियंत्रण करन्यासाठी प्रशासन का अपयशी ठरतोय, प्रशासनाला कर्तव्याची जाणीव नाही का असी शंका सर्व सामान्य नागरिकांमधे निर्माण झाली आहे, प्रशासनाचे असेच दुर्लक्ष होत राहीले तर चिमुर कोरोना रुग्णाचे माहेरघर व चिमुर शहरात मृत्युचे थैमान घातल्याशिवाय राहणार नाही.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!