एक कोरोना योद्धा नियतीने हिरावला

शंकरपुर - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )                      
शंकरपूर : - आपल्या जिवाची पर्वा न करता येथे 24 तास वैद्यकीय सेवा देणाऱ्या एका कोरोना योद्धाला आज नियतीने हिरावून घेतले आहे..                      
    शंकरपूर येथील वैद्यकीय सेवा देणारे डॉ. अविनाश माणिकराव ढोक वय 54 वर्ष यांचे आज कोरोनामुळे चंद्रपूर येथे निधन झाले. शंकरपूर येथे ते वैद्यकीय सेवा देत होते. या कोरोना काळात त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्ण तपासनी करून बऱ्याच लोकांना  आधार देत होते.  24 तासात जेव्हा केव्हा कोणत्याही रुग्णाणे त्यांचा दरवाजा ठोठावला तेव्हा ते रुग्णाला तात्काळ उपचार करीत होते. 
      डॉ. अविनाश माणिकराव ढोक हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून राजकीय जीवनातील त्यांचा वावर होता. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर, जिल्ह्य परिषदेचे समाज कल्याण सभापती पद भूषविलेले आहेत. शंकरपूर येथे विरोधी गटाचे पॅनल त्यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जात होती. ते आता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पातळीवर सदस्य असून त्या पक्षात कार्यरत होते. कोरोना होत पर्यंत त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू ठेवली होती परंतु जशी त्यांची  तब्बेत खालावत गेली तशी त्यांनी स्वतःची कोरोना टेस्ट करून घेतली होती त्यात ते पाझिटिव्ह आले होते. तेव्हा पासून ते घरीच  विलगीकरनात होते सोमवारी सायंकाळी अचानकपणे त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते.परंतु मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.आणि आणखी एक कोरोना योद्धा हिरावला. व शंकरपुरातील कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. त्यांच्यामागे आई -वडील,पत्नी, मुलं असा आप्त परिवार असून गावात व परिसरात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!