समाजोपयोगी नवरंग - प्राची फुलचंद गोंगले
समाजोपयोगी नवरंग - प्राची फुलचंद गोंगले
मुल : ( अमित राऊत )
संपूर्ण विश्व विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करुन चंद्रावर वसाहत निर्माण करण्याची तयारी करीत आहे तर दुसरीकडे भारतात महिलांना दुयम वागणूक दिली जात असल्याचे वेळोवेळी प्रकर्षाने दिसून येते. भारतात व्यक्तीस्वातंत्र असले तरी महिलांवर काहि बंधने लादलेली पहावयास मिळते. हि लादलेली बंधने झुगारुन आपापल्या आवडिच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेले रणरागीणींनी समाजात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणारे युवतीविषयी पब्लिक पंचनामामध्ये खास नवरात्र निमित्य विशेष लेखमाला प्रकाशित करण्यात येत आहे.
मनात दुर्दम्य इच्छाशक्ती असली, तर सर्व ध्येय सहज गाठता येतात. पण त्यासाठी अपार मेहनत घ्यायची, मनाशी खुणगाठ बांधणे आवश्यक आहे. मुलसारख्या शहरातील युवतीने आज नाटयक्षेत्रात कुणीही गाॅडफाॅदर नसतांना, केवळ मेहनत व कौशल्याचा बळावर आपल्या कामाशी प्रामाणिक राहुन, आपले पाय घट्ट रोवू पाहतेय.
अल्पावधीतच नाट्यक्षेत्रात रसिक मनावर स्वत:ची अमीट छाप पाडून, अधिराज्य गाजवणारी मूल शहरातील या नाट्य कलावंत युवतीचे नाव आहे प्राची फुलचंद गोंगले. प्राचीचे वडील सेवानिवृत्त शिक्षक असून आई शिक्षिका म्हूणून कार्यरत आहे. थोरला भाऊ ऋषभ नुकताच पुण्याहून एम.बी.ए.ची पदवी प्राप्त केली. तर धाकटा भाऊ सध्या बी.एस.सी.एग्रीकल्चरलचे शिक्षण घेत आहे.
प्राचीचे सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण ग्रामिण भागातील इतर सर्वसामान्य मुलींप्रमाणेच मुल तालुक्यातील फिस्कुटी या लहानश्या गावात जिल्हा परीषदेच्या मराठी शाळेतूनच झाले. तीसरी व चौथी पर्यंत मूलच्या गांधी चौक स्थित जिल्हा परिषद मुलींची उच्च प्राथमिक शाळा, तर पाचवी ते दहावीचे माध्यमिक शिक्षण नवभारत कन्या विद्यालय मुल येथे झाले. बारावी शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली, पदवीचे शिक्षण डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अमरावती आणि एम.बी.ए.चे शिक्षण पुण्याच्या जानकीदेवी बजाज इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च पुणे येथे सुरू आहे.
प्राचीला अभिनयाची आवड तशी लहानपनापासुनच होती. व्यवसायाने शिक्षिका असलेल्या आईमुळेच कलाक्षेत्रात प्रोत्साहन मिळाले. बालवयातच शाळेत सास्कृतीक कार्यक्रमात नृत्य करणे, संगीत म्हणणे, अभिनय करणे सुरू झाले. अनेक कार्यक्रमात लहानपनीच प्रथम क्रमांक मिळत गेल्याने प्रोत्साहन आणि उत्साह वाढतच गेला. पाचव्या वर्गात असतांनाच संगिताचे धडे घेणे सुरू केले. अनेक तालुका स्तरावरील कार्यक्रमात सहभागी होऊन पारितोषिकही मिळविले. शिक्षणासोबतच हा प्रवास सुरूच राहीला. यातुनच कला क्षेत्रातली आवड वृध्दींगत होत गेली. स्वतःला ओळखणं महत्वाचे आहे, असे ती सांगते.
अमरावतीला शिक्षणासाठी गेलेली असतांना प्रथम वर्षात युवा महोत्सव नावाची एक स्पर्धा होती, त्यात प्राचीने भाग घेतला, आणि तिथूनच नाट्यरंगभूमीत काम करण्याची सुरुवात झाली. मग हळूहळू नाटक हा आयुष्याचा अविभाज्य भाग होत गेला. राज्यनाट्य, कामगार कल्याण नाटक, पुरुषोत्तम करंडक, अहमदनगर करंडक, महिला नाट्य, अशा विविध ठिकाणी नाटकाचे प्रयोग प्राचीने केले. अमरावती नंतर नागपूर, अकोला, यवतमाळ, सातारा, कोथरूड, पुणे, मुंबई सारख्या मोठया महानगरात सुद्धा नाट्य प्रयोगाचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली.
पुढील उच्च शिक्षणाकरीता पुण्यात गेल्यावर तिथे एक ग्रृप मिळाला, आणि नाट्य अभिनयाचा प्रवास अखंडपणे सुरूच राहिला. या प्रवासात अनेक नवीन लोकं भेटत होती. त्यांच्याशी मैत्रीसंबंध जोडून सोबत काम करावं लागत असे. यात एक वेगळाच आनंद होता. या क्षेत्रात काम करताना स्पर्धक खूप भेटतात, पण मनात जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. असे ती ठामपणे सांगते.
झाडीपट्टी भागातील असल्याने सुरूवातीला अभिनय क्षेत्रात काम करत असताना भाषेची अडचण निर्माण झाली. कारण झाडीपट्टीतील मराठी बोलीभाषा आणि पुण्या - मुंबईतल्या भाषेतील तफावत ही प्रकर्षाने नाटकात अभिनय करतांना जाणवत होती. पण प्राची अभिमानाने सांगते की, झाडीपट्टीतील भाषाच ही माझी प्रमुख ओळख आहे. झाडीपट्टीत काम करायला आवडेल काय? असा प्रश्न करताच संधी मिळाली तर नक्कीच झाडीपट्टीत काम करायला आवडेल, असे प्राचीने सांगितले.
नाट्यक्षेत्रात काम करायला वडिलांच्या विरोध असला तरी आई मात्र कायम साथ व प्रोत्साहन देत राहिली. नाट्य करीत असतांनाही शिक्षणाकडे मात्र दुर्लक्ष केले नाही. प्रत्येकांचं नाटकाबद्दलचे मत हे नक्कीच वेगवेगळं असू शकते. परंतू नाटकामुळे एक नवीन ओळखच नाही, तर जगण्याचा मार्ग देखील मिळाला. असे ती आवर्जुन सांगते. मराठी नाट्यरंगभूमीवर प्राचीने आतापर्यंत काळोख देत हुंकार, कॉटेज नं. ५४, कथा दिनूच्या मृत्युपत्राची, आवघडीचे पाच दिवस, रंग जगण्याचा, बी. पॉझिटिव्ह, मेक इन इंडिया यांसारखे विविध नाटकांमध्ये काम केले आहे.
विशेष म्हणजे प्राचीने काळोख देत हुंकार या नाटकांत शिरमी नावाच्या आई हे पात्र रंगविले. अभिनयात जिवंतपणा असल्याने शिरमी हे पात्र रसिकांच्या मनात घर करून गेले. रसिकांचे भरभरून प्रेम मिळालेल्या प्राचीला राज्यस्तरीय कामगार कल्याण नाट्य स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट महिला अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केल्या गेला. प्राचीच्या विविध कलागुणांमुळे पुणेे येथे असताना मराठी प्रसिद्ध अभिनेत्री अनिताताई दाते केळकर यांची मुलाखत घेण्याची संधीही तीला मिळाली. तो क्षण कायम स्मरणात राहणारा
आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला आहे.
आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला आहे.
युवा महोत्सवातुन नाट्यक्षेत्रात सुरू केलेला प्रवास कायम ठेवून प्राचीला अभिनय क्षेत्रात आपले पाऊल अधिक खोलवर रुतवायचे आहे. संधी मिळाली की त्याच सोनं करायचे आहे. स्वत: या क्षेत्रात मोठे बणुन ग्रामिण भागातील युवक - युवतींना नाट्य क्षेत्राबद्द्दल प्रोत्साहित करायचे आहे. अभिनय क्षेत्रात आपले स्वत:चे वेगळेपण जपणारे नाव तसेच स्वत:चे अस्तित्व असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. आणी तसे वाटण्यात काही गैर नाही. तीने निवडलेला मार्ग मोठा व खडतर असला, तरी त्यावर चालायची मनोमन तयारी केलेल्या प्राचीला पुढील वाटचालीकरीता पब्लिक पंचनामाकडून मनपुर्वक शुभेच्छा...!







ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाप्राचीला पुढील जीवनात यशस्वी होण्यासाठी भरभरून शुभेच्छा💐💐
उत्तर द्याहटवा