समाजोपयोगी नवरंग - अवंती अनिल गांगरेड्डीवार

समाजोपयोगी नवरंग - अवंती अनिल गांगरेड्डीवार

मूल :सचिन वाकडे

               संपूर्ण विश्व, विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करुन चंद्रावर वसाहत निर्माण करण्याची तयारी करीत आहे तर दुसरीकडे भारतात महिलांना दुयम वागणूक दिली जात असल्याचे वेळोवेळी प्रकर्षाने दिसून येते. भारतात व्यक्तीस्वातंत्र असले तरी महिलांवर काहि बंधने लादलेली पहावयास मिळते. हि लादलेली बंधने झुगारुन आपापल्या आवडिचा, विविध क्षेत्रात कार्यरत असलेले रणरागीणींनी समाजात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणारे मुल तालुक्यातील युवती तसेच महिला यांच्याविषयी पब्लिक पंचनामामध्ये खास नवरात्र निमित्य प्रवाहाच्या विरुद्ध जाणाऱ्या युवतींची विशेष लेखमाला प्रकाशित करण्यात येत आहे.

               सुखी व आनंदी परिवारात जन्म झालेल्या अवंती अनिल गांगरेड्डीवार ह्या तरुणीने शिकई मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचे तसेच मुल शहराचे नाव गौरवांकित केले आहे. अवंती च्या कुटुंबात ५ सदस्य असून आई गृहिणी तर वडिल जिल्हा परिषद शाळा कोसंबी इथे शिक्षकआहेत. मोठा भाऊ अंकुश हा अभियंता असून लहान भाऊ रोहित हा सिए इंटर्नशिप करीत आहे. आज पर्यंत च्या कारकिर्दीत मिळालेल्या यशाचे श्रेय ती आई, वडील व प्रशिक्षक संदीप पेदापल्ली यांना  देते. घरून पूर्ण सहकार्यासोबतच भक्कम पाठींबा मिळाल्याने, लहानपणापासूनच क्रीडा क्षेत्रात अव्वल राहता आले. हाच पाठींबा कायम सोबत असल्यामुळे घरच्यांच्या विश्वास सार्थ ठरवत, २०१८ साली दक्षिण कोरिया मध्ये झालेल्या मार्शल आर्ट क्रीडा प्रकारात विश्व अजिंक्य स्पर्धेमध्येसुवर्णपदक पटकावता आला.
               एम. ए. (इंग्रजी) पुर्ण केले असून अवंतीचे शिक्षण हे मुल येथेच झाले आहे. दहावी नवभारत विद्यालय मुल, बारावी नवभारत जूनियर सायन्स कॉलेज मुल, बीएससी शासकिय सायन्स कॉलेज गडचिरोली, बीपीएड राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर, एम पी एड शासकिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कॉलेज नागपूर येथे शिक्षण घेतलेल्या अवंती सध्या गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय मुलींची आश्रम शाळा खमनचारू अहेरी येथे क्रीडा शिक्षक म्हणून काम करीत आहे.
               खेळणे, स्केच काढणे, मेहंदी, रांगोळी काढणे, पाक कला, पुस्तक वाचण, व गाणी ऐकणे व गाणे यासारख्या आवडीनिवडी असणाऱ्या अवंतिला सैन्यात जायचे होते.  
समाज मुलींना दुय्यम वागणूक देतो. मुलींपेक्षा मुले सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याचे समाज सांगतो. पण वास्तविकता हि सर्वांनाच ज्ञात आहे. आज एकही क्षेत्र असे नाहि की, जिथं मुलींनी बाजी मारलेली नाहि. ग्रामिण भागात मुली आणि खेळ हा एक विलक्षण दुर्मिळ प्रकार समजला जातो. सुरुवातीला क्रीडा क्षेत्रात काम करताना सर्वासारखीच अवंतीपुढे संकटे आली, पण त्यांच्या परिणाम तीला कधी सोसावं लागलं नाहि.

               अवंतीच्या मते, आजच्या पालकांना आपला मुलगा किंवा मुलगी ऑफिसर बनावं, इंजिनिअर, डॉक्टर बनावं असं सर्वांना वाटतं. पण कोणालाच असं वाटत नाही की, माझा मुलगा अथवा मुलगी ही एखाद्या क्रीडा प्रकारात आपल्या भारतासाठी आपल्या देशाचा नेतृत्व करावं. आजचा समाज मुलीलाच नव्हे तर मुलाला देखील क्रीडा क्षेत्रात जाण्यास पाठिंबा देत नाही. याबाबतीत अवंती मात्र वडिलांनी दिलेल्या बडी सोच, कडी मेहनत, पक्का इरादा या गुरुमंत्राचा स्विकार करीत आलेल्या परिस्थितीपुढे लाचार न होता ध्येय गाठणे.
                लहानपणापासून क्रिडाक्षेत्रात जायची आवड होती. तर दुसरीकडे अधिकारी बणायचं स्वप्न होतं. क्रिडा क्षेत्रात किंवा सैनिकीक्षेत्रातआवश्यक असलेली एनसीसी ए, बी, सि प्रमाणपत्र ए ग्रेड मध्ये उत्तीर्ण असलेल्या अवंतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर लद्दाख येथे महाराष्ट्राचे नेतृत्व केलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नेपाल, भूतान, कोरिया पाच सुवर्णपदक पटकावून तसेच राष्ट्रीय स्तरावर गोवा, अमृतसर, जम्मू काश्मीर, पाठण, मुंबई, रोहतक सहा सुवर्णपदक पटकावला आहे. राज्यस्तरावर आठ पदके पटकावलेली आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत तायकांडो या क्रीडा प्रकारात सलग तीनदा ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी खेळून विद्यापीठाचे कलर कोट प्राप्त केले आहेत. कबड्डी, खो-खो या क्रीडा प्रकारात देखील तिने प्राविण्य मिळविलेले आहे.
               अवंतीला भविष्यात मुलींसाठी व महिलांसाठी आत्मसंरक्षणाचे धडे द्यायचे आहे.देशासाठी अजून पदके आणायचे आहेत व क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक युवतींना सहभाग घेण्यास प्रोत्साहित करायचे आहे. आपल्या जिल्ह्यातील मुलींचं खेळ खूप छान आहे. आणि जर त्यांना योग्य मार्गदर्शन व शिक्षण मिळाले तर त्या अतुलनीय काम करू शकतील असा विश्वास तीला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाच सुवर्णपदक पटकावलेल्या अवंतीचा अनुभव अविस्मरणीय आहे. तीला तालुक्यातील महिलांसाठी, मुलींसाठी सेल्फ डिफेन्स अकॅडमी सुरु करायची आहे. क्रिडाक्षेत्रात तालुक्यातील युवती सहभागी होऊन देशाचे नाव मोठं करावे.
               क्रिडाक्षेत्रात आपले स्वताचे वेगळेपण जपणारे नाव असावे असे प्रत्येकाला वाटत असते. आणी तसे वाटण्यात काहि गैर नाहि. क्रिडाक्षेत्रात काम करतांना देशवासीयांच्या काहि अपेक्षा असतात त्या पुर्ण करणे हे एकच लक्ष्य डोळ्यासमोर असणे आवश्यक ठरते. मार्ग मोठा व खडतर असला तरी त्यावर चालायची मनोमन तयारी केलेल्या अवंतीला पुढील वाटचालीकरिता पब्लिक पंचनामाकडून मनपुर्वक शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!