अखेर रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर खडसंगी बफर वनविभागाने जप्त करून केला चिमूर तहसील च्या स्वाधीन
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चंद्रपूर : - दिनांक. १८/१०/२०२० रोजी खडसंगी (बफर) परिक्षेत्रा अंतर्गत के. डब्लु. धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर),खडसंगी, एस. आर. औतकर, क्षेत्र सहाय्यक, खडसंगी व एम. आय. बोरकर, वनरक्षक , खडसंगी-II हे नियत क्षेत्र खडसंगी-I मध्ये गस्त करुन सकाळी ०५:०० वाजता परत येत असतांना कक्ष क्र.१५ प्रादेशिक वरोरा चिमुर रोड, खडसंगी मध्ये अवैध्यरित्या रेती उत्खनन करुन वाहतुक करतांना १ ट्रॅक्टर वनकर्मचाऱ्यांना आढळले. वनकर्मचाऱ्यांनी शिताफिने ट्रॅक्टर ताब्यात घेतले महिद्रा 475 DI कंपनीचे ट्रॅक्टर चेचीस. NJNWL478 , इंजिन क्र. 006505439C1, ट्रॉली चेचीस क्रमांक. TI/14/1202/47 ताब्यात घेडुन वनपरिक्षेत्र कार्यालयात आणुन जमा केले. सदर घटनास्थळ या विभागाच्या हददीबाहेर असल्यामुळे प्रकरण महसुल विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.व सदर ची कार्यवाही गुरुप्रसाद , उपसंचालक (बफर), ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर तसेच ए. जी. जाधव , सहाय्यक वनसंरक्षक (जंकास-१) , ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प , चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली के. डब्लू, धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर), खडसंगी यांनी केली.तर दिनांक.१९/१०/२०२० ला चिमूर तहसील येथे ट्रॅक्टर देण्यात आले.यामुळे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!