महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ कर्मचारी संघटनाची सर्वसाधारण सभा संपन्न

केंद्रीय अध्यक्ष पदावर अजय पाटील, नागपूर यांची निवड
जिल्हा  - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चंद्रपूर : - महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ कर्मचारी संघटनाची सर्वसाधारण सभा दिनांक.१८/१०/२०२० रविवार ला वन विकास भवन, लिलावगृह, बल्लारशाह येथे दुपारी ११:३० वाजता आयोजित करण्यात आली होती. सदर सभेमध्ये केंद्रीय अध्यक्ष पदावर अजय पाटील, नागपूर यांची निवड करण्यात आली असून, बी.बी. पाटील, कार्याध्यक्ष, आर. एस. रोटे, उपाध्यक्ष, सचिन बी. दुर्गेवार, उपाध्यक्ष, राहूल वाघ, उपाध्यक्ष, आर.पी. बलैया, सरचिटणीस, साहेबराव चालले, कोषाध्यक्ष, अशोक तुंगेनवार, एस. आर. शिंपाळे, टि.एच. हरिणखेडे, एम. डी. काळे, सुधाकर राठोड, बी.सी. देशपांडे, के.व्ही. सानप, जी.डी. शिंदे, ए.डब्ल्यू. राळे, व्ही. के. राठोड, जी.डी. मडावी व कु. प्रतिक्षा दहिवलकर इ. सचिव म्हणून संघटनेच्या केंद्रीय कार्यकारीणी मध्ये निवड करण्यात आली.

अजय पाटील, नागपूर हे महाराष्ट्र राज्य वन विभागातील पदोन्नत वनपाल, वनरक्षक व वनमजूर कर्मचारी यांची संघटना गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे नेतृत्वात कार्यरत असून, कर्मचा-यांना न्याय मिळवून देण्याकरीता त्यांनी अथक परिश्रम केलेले आहे. त्यामूळे महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी, कर्मचारी संघटनेवर त्यांची केंद्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली असल्याने कर्मचा-यांमध्ये उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले असून, त्यांचेकडून कर्मचा-यांचे प्रश्न निकाली निघतील, अशी कर्मचा-यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!