शिष्यवृत्ती परीक्षेत शारदा विद्यालय तुमसर चे घवघवीत यश
भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
भंडारा : - महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत स्थानिक शारदा विद्यालय तुमसर येथील वर्ग पाचवीच्या चार विध्यार्थीनि आणि वर्ग आठवीच्या चार विद्यार्थीनी असे एकूण आठ विद्यार्थीनी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरल्या.त्यामध्ये वर्ग आठवीच्या कु गुंजन देवानंद कोकासे, कु तमन्ना अजय पंधरे, कु आयुषी योगेश भुरे,कु-नंदिनी सोहनलाल भुरे तर वर्ग पाचवीच्या कु. श्रद्धा अजित सव्वालाखे, कु. प्रगती रमेश सिगनजुडे,कु.श्रेया लालाजी आगाशे,कु श्रावणी सार्वे ह्यांनी प्राविण्य प्राप्त केले.विद्यालयाचे प्राचार्य राजकुमार बालपांडे यांनी विद्यार्ध्यांचे अभिनंदन केले.आर टी तिडके,आशिष मुधोळलकर,रेखा बडवाईक,प्रिती भोयर आदी शिक्षकानी विशेष मार्गदर्शन केले.सर्व शिक्षक वृंदानी विध्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!