८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने मांगरुड शाळेला वैभव निकुरे यांच्याकडून नवीन प्रिंटर भेट"
नागभिड (तालुका प्रतिनिधी)
आज १५ ऑगस्ट २०२६, भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन* जिल्हा परिषद शाळा मांगरुड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने शाळेची पाहणी करत असताना एक महत्त्वाची अडचण समोर आली. शाळेत नवोदय परीक्षेच्या तयारीसाठी सराव पेपर घेतले जातात, मात्र शाळेतील प्रिंटर खराब असल्याने विद्यार्थ्यांचे पेपर प्रिंट करण्यात अडचणी येत होत्या.
ही माहिती शाळेचे कर्तव्यनिष्ठ शिक्षक *श्री. गायकवाड सर* आणि मुख्याध्यापक *श्री. नारमलवार सर* यांनी *श्री. वैभव निकुरे*, उपसरपंच ग्रामपंचायत मांगरुड यांना दिली.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आज *श्री. वैभव निकुरे* यांच्याकडून जिल्हा परिषद शाळा मांगरुडला नवीन प्रिंटर भेट देण्यात आला. यामुळे आता विद्यार्थ्यांना नवोदय व इतर स्पर्धा परीक्षांसाठी सराव पेपर घेणे सुलभ होणार आहे.
*अल्पोहाराचा कार्यक्रम*
याचबरोबर *ग्राम काँग्रेस कमिटी, मांगरुड* यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थी आणि उपस्थित गावकऱ्यांसाठी अल्पोहाराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रामुख्याने उपस्थिती:
या कार्यक्रमाला संपूर्ण शिक्षकवृंदासह गावातील मान्यवर *मा. पितांबरजी अलोने, मा. प्रेमदासजी ठाकरे, मा. तुकाराम मेश्राम, मा. नारायण रडके, मा. दिपक चनफणे, मा. दत्तू चिलबुले, मा. नरेश कोहळे, मा. अरुण कोहळे, मा. लोकेश वाढाई* आणि समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेल्या या मदतीबद्दल ग्रामस्थांनी वैभव निकुरे आणि ग्राम काँग्रेस कमिटीचे आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!