कुडेगाव गवराळा रस्ता बांधकामासाठी २.४० कोटीचा निधी मंजुर
बांधकाम विभागाची माहिती
विधानसभा अध्यक्षांचा पुढाकार
भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
भंडारा : - लाखांदुर तालुक्यातील कुडेगाव गवराळा रस्त्यावरचे गत शासन काळात भूमिपूजन होऊनही HB बांधकाम न झालेल्या कुडेगाव गवराळा हा ३ किमी लांबीचा रस्ता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या पुढाकाराने मंजुर करण्यात आला आहे.सदर रस्ता बांधकामासाठी राज्य शासनाने सुमारे २.४०कोटीचा निधी मंजुर केला असुन पुढील दोन महिन्यांनी या रस्ता बान्धकामाला सुरुवात केली जाणार असल्याची विश्वसनीय माहिती बांधकाम विभागांतर्गत देण्यात आली आहे. प्राप्त माहिती नुसार कुडेगाव गवराळा हा ३ किमी लांबीचा रस्ता गत ३ व रर्षापुर्विपासून बांधकामाच्या प्रतिक्षेत होता.गत शासन काळात या रस्त्याचे बांधकाम करन्याहेतू या भागातील प्रमुख लोकप्रतिनिधिंनि रस्ता बान्धाकामाचे भूमिपूजन देखील केले होते.मात्र भूमिपूजन होउन एक वर्षाहून अधिक काळ लोटूनही या रस्तयाच्या बांधकामाला सुरुवात न झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे या मार्गावरील बससेवा गत ३ वर्षापेक्षा अधिक.काळा पासुन बंद पडली असल्याने या भागातील जनतेला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता बांधकामाची दखल घेत या विभागाचे आमदार तथा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी पुढाकार घेत सदर रस्ता बांधकामासाठी सुमारे ३.४० कोटी रुपयाचा निधी राज्यशासनांतर्गत मंजुर केला आहे.त्यानुसार सबंधित रस्ता बांधकामाला प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळाली असुन निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यानुसार पुढील दोन महिन्यात या रस्ता बांधाकामाला सुरुवात होणार असल्याची विश्वसनीय माहिती बांधकाम विभागांतर्गत देण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!